Marriage | (Image used for representational purpose only)

Marriage Age For Boys: लग्न करण्यासाठी मुलींच्या वयात वाढ करण्यावरुन वाद सुरु आहे. याच दरम्यान, पंजाब-हरियाणा हायकोर्टाने नुकत्याच एका प्रकरणी असे म्हटले की, 21 वर्षाखालील कोणताही तरुण पुरुष लग्न करु शकत नाही. परंतु त्याला 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिलेसोबत तिची परवानगी असल्यास त्यांना कपल प्रमाणे लिव्ह इन मध्ये राहण्यास काही हरकत नाही. हायकोर्टाचा हा निर्णय मे 2018 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासंदर्भात आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, कोणतेही तरुण कपल लग्नाशिवाय एकत्रित राहू शकतात.(Cabinet Meeting Update: मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याच्या प्रस्तावाला मोदी कॅबिनेटकडून मंजुरी)

हायकोर्टाने पंजाबच्या गुरुदासपुर जिल्ह्यातील एका कपल्सच्या याचिकेवर सुनावणी केली होती. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिलेल्या कपलने याचिकेच्या माध्यमातून सुरक्षितेची मागणी केली आहे. या दोघांचे वय 18 वर्षांहून अधिक आहे. तरुण 18 वर्ष असून हिंदू मॅरेज अॅक्ट अंतर्गत कायद्याने तो 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करु शकत नाही.(Uttar Pradesh: गरम पाण्यावरुन झालेल्या वादावरुन तुटले 16 वर्षांचे नाते, नवऱ्याने बायकोला दिला तिहेरी तलाक)

हायकोर्टात सुनावणी दरम्यान, न्यायाधीश हरनरेश सिंह गिल यांनी असे म्हटले की, सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि आयुष्याची सुरक्षितता करावी. न्यायाधीशांनी गुरुदासपुर एसएसपीला निर्देशन दिले आहेत की, या तरुण कपलच्या आग्रहावर निर्णय घेत त्यांना सुरक्षितता द्यावी.