Cabinet Meeting Update: मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याच्या प्रस्तावाला मोदी कॅबिनेटकडून मंजुरी, आता संसदेत सादर केले जाणार बिल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Cabinet Meeting Update: कॅबिनेटच्या बैठकीत मुलींच्या लग्नाचे कमीत वय वाढवण्यासंदर्भातील बिलाला मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन दिलेल्या आपल्या भाषणात सरकारचा हेतू स्पष्ट केला होता. याच पार्श्वभूमीवर आता मुलींच्या लग्नाचे वय कमीत कमी 18 हून 21 वर्षे केले जाण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारने तयारी सुद्धा सुरु केली आहे. या संदर्भातील बिल संसदेत याच सत्रात सादर केले जाण्याची अपेक्षा आहे. लग्नाचे वय वाढवण्यासाठी बाल विवाहच्या कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. परंतु सध्याच्या कायद्यात मुलींचे लग्नाचे वय 18 वर्ष असल्याचे ठरवण्यात आले आहे.

कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील बिलाला बुधावारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटची बैठक पार पडली. या मुद्द्यावर गेल्या वर्षात गठित करण्यात आलेल्या टास्क फोर्सने आपल्या रिपोर्टमध्ये लग्नाचे कमीत कमी वय 18 वर्षे नसून 21 वर्षे असावे अशी सिफारिश केली होती.(Cabinet Meeting Update: मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेला मंजुरी, इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती)

माजी खासदार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सचे गठन करण्यात आले होते. टास्क फोर्सने आपल्या रिपोर्टमध्ये आई बनवण्याचे वय आणि महिलांसंबंधित अन्य मुद्द्यांवरुन ही आपली सिफारिश केली होती. नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर वीके पॉल सुद्धा या टास्क फोर्सचे सदस्य होते. या व्यतिरिक्त आरोग्य आणि परिवार कल्याण, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण आणि साक्षरता मिशन आणि न्याय- कायदे मंत्रालयांच्या विधेयकाच्या विभागाने सचिव टास्क फोर्सचे सदस्य होते. टास्क फोर्सची गेल्या वर्षात जून मध्ये स्थापना करण्यात आली आणि त्याचवेळी डिसेंबर महिन्यात त्यांनी आपला रिपोर्ट दिला होता. टास्क फोर्ससचे असे म्हणणे होते की, पहिल्या मुलाला जन्म देण्याच्या वेळी मुलीचे वय 21 वर्ष असावे.