BJP Logo (Photo Credits: IANS)

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांच्या निधनानंतर 24 तासाच्या आतमध्येच भाजपाचे प्रमोद सावंत मुख्यमंत्रीपदी तर विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आज नितीन गडकरी यांनी स्थानिक आमदारांशी बोलून वाटाघाटी केल्या आहेत. त्यानुसार आज भाजपा (BJP) सत्तास्थापनेचा दावा करून दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री पद प्रमोद सावंत सांभाळणार?

मनोहर पर्रिकरांचे पार्थिव गोवा कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनाला ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी थोड्याच वेळात भाजपा अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचणार आहेत. त्यानंतर नितिन गडकरींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. गोव्यात 12 भाजपा आमदारांपैकी एक नाव घोषीत केले जाईल असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी श्रीपाद नाईक, विश्वजीत राणे  यांचे नाव चर्चेमध्ये होते.

 ANI ट्विट 

प्रमोद सावंत हे विधानसभा अध्यक्ष होते. पर्रिकर यांच्याअनुपस्थितीमध्ये तेच अनेक शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहत असे. काल रात्री गोव्यात नितीन गडकरी पोहचले असून मनोहर पर्रिकरांनंतर गोव्यामध्ये भाजपाला पाठिंबा देण्यासाठी गोवा फॉर्वर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी यांच्यासोबत सकारात्मक वाटाघाटी केल्या आहेत.  गोव्यात कॉंग्रेसचे सर्वाधिक आमदार असल्याने कॉंग्रेसही सत्ता स्थापनेचा दावा करीत आहे.