Mann Ki Baat on July 26: कोरोना व्हायरस संकटाचा धोका अद्यापही कायम; डॉक्टर, नर्स यांच्याकडून प्रेरणा घ्या- पंतप्रधान मोदी
Prime Minister Narendra Modi (Photo Credits: ANI)

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा धोका अद्याप टळला नाही. काही ठिकाणी कोरोना व्हायरस मोठ्या वेगाने पसरतो आहे. कोरोणा अद्यापही तितकाच धोकादायक आहे. जितका सुरुवातीला होता. म्हणूनच आपण सर्वांना काळजी घ्यायला हवी, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केले आहे. मनक की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आज (26 जुलै 2020) बोलत होते. चेहऱ्यावर मास्क, साबणाने हात धूने, व्यक्तिगत स्वच्छता राखणे, सुरक्षीत अंतर ठेवणे इतकेच नव्हे तर देशातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगणे, उघड्यावरती न थुंकणे यांसारख्या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगिले. कोरोना व्हायरसपासून लढण्यासाठी सुरक्षीतता हेच आपले शस्त्र आहे, असेही ते म्हणाले.

कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, जगभरातील देशांच्या तुलनेत भारतात कोरोना व्हायरस संसर्ग आणि बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. जातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यूदरही प्रचंड प्रमाणावर कमी आहे. भारत आपल्या लक्षवधी देशवासियांचे जीवन सुरक्षीत ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. (हेही वाचा, Mann Ki Baat on July 26: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमात राम मंदिर मुद्द्यावर काय बोलणार)

डॉक्टर, नर्स यांच्याकडे पाहा

काही लोकांना मास्क, रुमाल चेहऱ्याला बांधण्याचा त्रास वाटतो. परंतू, जर आपल्याला त्रास होत असेल तर अशा वेळी आपल्या आजूबाजूच्या डॉक्टर, नर्स, यांच्याकडे पाहा. हे लोक सातत्याने चेहऱ्याला मास्क लाऊन तासनतास काम करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

कारगिल विजय दिवसाचे स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात कार्यक्रमाची सुरुवात कारगिल विजय दिवसाचे स्मरण करुन केली. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आजच्या दिवशी भारतीय सैन्याने कारगिलमध्ये भारताच्या विजयाचा झेंडा फडकवला होता. कारगिलमध्ये विजयोस्तव साजरा करताना आणि बलिदान देताना भारताच्या वीरपुत्रांना पराक्रम करताना अवघ्या जगाने पाहिले होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की, 26 जुलै हा दिवस मै-जुलै 1999 मध्ये कारगिल युद्धातील भारताच्या विजयाची गौरवशाली गाथा आहे. आमच्या शूर विरांना सलाम.