Mann Ki Baat on July 26: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमात राम मंदिर मुद्द्यावर काय बोलणार
पीएम नरेंद्र मोदी (Photo Credit-ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आपल्या 'मन की बात' ( Mann Ki Baat) या कार्यक्रमात आज 11 वाजता भाषण करणार आहेत. मन की बात कार्यक्रमाचा आजचा 67 वा भाग आहे. या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील विविध घटना, घडामोडी यांवर भाष्य करतात. दरम्यान,  अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिर (Ram Mandir) भूमिपूजनाची देशभरात चर्चा आहे. त्यामुळे मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी राम मंदिर मुद्यावर काही बोलणार का याबाबत उत्सुकता आहे.

देशात कोरोना व्हायरस संकट आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले जाईल, असे कोणतेही औषध, लस अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हा एकच उपाय आहे. असे असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करावा का? याबाबत अनेकांनी मतमतांतरे व्यक्त केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या अनेक भाषणांमधून सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून सांगितले आहे. असे असताना राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमासाठी निवडलेली वेळ देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे आजच्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी काही भाष्य करणार का याबाबत उत्सुकता आहे.Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या कार्यक्रमातून आज देशवासियांशी साधणार संवाद

येत्या पाच ऑगस्ट या दिवशी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे समजते. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांदीच्या पाच विटा रचून राम मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करतील.