Mann Ki Baat July 25: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रगीताचा आवाज घुमणार; देशवासियांना rashtragaan.in वर रेकॉर्डिंग शेअर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
PM Modi| Photo Credits: Twitter/DD News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (25 जुलै) 79 वा मन की बातचा कार्यक्रम पार पडला आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान देशाला संबोधून एक संदेश देतात. महिन्याभरातील घडामोडींचा आढावा घेत पुढील काही दिवसांत येणार्‍या मोठ्य कार्यक्रमाची, अभियानांची माहिती देतात. त्याचप्रमाणे आजच्या मन की बात मध्ये मोदींनी भारतीयांना देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची आणि त्याच्या सेलिब्रेशनची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी अधिकाधिक भारतीयांनी देशाचं राष्ट्रगीत आपल्या आवाजात रेकॉर्ड करून rashtragaan.in वर संकेतस्थळावर शेअर करण्याचं आवाहन केले आहे. इथे पहा संपूर्ण नरेंद्र मोदींचे संपूर्ण भाषण .

सांस्कृतिक मंत्रालयाकडून यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष आणि अनेक कार्यक्रमांचे, अभियानांचे आयोजन करण्यात आले आहेत येत्या काही दिवसांत त्याची माहिती दिली जाईल असेदेखील नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. देशाचा स्वातंत्र्यदिन हा केवळ सरकारचा कार्यक्रम नाही, तो कोणत्याही राजकीय पक्षापुरता सीमित असणार नाही त्यामध्ये सार्‍यांनी उत्स्फुर्तेने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. Mann Ki Baat 79th Edition Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' इथे ऐका लाईव्ह.

दरम्यान स्वातंत्र्यदिन सोहळ्यासोबतच आज मोदींनी कारगिल दिवस, हातमाग दिवस यावरही प्रकाश टाकत नागरिकांना आपल्या नेहमीच्या लहान लहान गोष्टींमधून देशसेवेचं व्रत जपावं असं आवाहन केले आहे. आपली दैनंदिन कामे करतांनाही आपण राष्ट्र निर्मितीचे काम करु शकतो. जसे की ‘व्होकल फॉर लोकल’. आपल्या देशातील स्थानिक उद्योजक, कलाकार, शिल्पकार, विणकर यांना आधार देणे, हे आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनले पाहिजे. असे ते म्हणाले आहेत.