पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (30 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Maan Ki Baat) या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. 'मन की बात' हा रेडिओ प्रोग्रॅम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर वर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लेटेस्ट घडामोडी, समस्या यासंदर्भात जनतेशी संवाद साधतात. आज मन की बात या कार्यक्रमाचा 68 वा एपिसोड पार पडणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमासाठी कोणत्या विषय घ्यावा, यासंदर्भात सल्ला देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिक आपल्या सूचना, सल्ले NaMo किंवा MyGov अॅपवर पाठवू शकत होते. तसंच मेसेज रेकॉर्ड करुन 1800-11-7800 वरही पाठवण्याची संधी उपलब्ध होती. यासाठी 10 ऑगस्टपासून फोनलाईन्स ओपन झाल्या होत्या.
दरम्यान देशात अनलॉक 4 ची घोषणा झाली आहे. तसंच देशातील काही राज्यांमध्ये निर्माण झालेली पूरपरिस्थिती, नीट, जेईई परीक्षांचा मुद्दा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोलणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. मन की बात हा कार्यक्रम लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून तुम्ही येथे पाहू शकता...
तसंच खालील साईट्सवर देखील लाईव्ह प्रोग्रॅम पाहता येईल:
• http://facebook.com/BJP4India
• http://pscp.tv/BJP4India
• http://youtube.com/BJP4India
• http://bjplive.org
गेल्या महिन्यात 26 जुलै रोजी मन की बात हा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी कारगीर विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली होती. तसंच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले होते.