Arrested | (File Image)

केंद्रीय तपास यंत्रणा (Central Bureau of Investigation) अर्थात सीबीआयने (CBI) मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणात चौघांना अटक केली आहे. या चौघांवर दोन विद्यार्थ्याच्या हत्येचा आरोप आहे. दोन्ही विद्यार्थी जुलै 2023 पासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कथीत मृतदेहाची छायाचित्रे ऑगस्ट 2023 च्या शेवटच्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चौघांमध्ये दोन महिला आणि दोन अल्पयीन मुलांचा समावेश आहे. कारवाईसंदर्भात सीबीआयने अधिक माहितीसंदर्भात दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, दोन अल्पवयीन मुलांना त्यांच्या कल्याण, संरक्षण आणि कायदेशीर कारवाईसाठी कामरूप मेट्रो जिल्ह्यातील बाल संरक्षण अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आले आहे.

पाओमिनलून हाओकीप, मालसॉन हाओकीप, लिंगनेइचॉन्ग बाईट आणि तिन्नेखोल अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. लिंगनिचॉन्ग बाईटे हा हत्या झालेल्या विद्यार्थिनीचा मित्र होता, असे या प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती असलेल्या लोकांनी सांगितले. संशयितांपैकी एक कथितपणे चुरचंदपूर येथील बंडखोर गटाच्या सदस्याची पत्नी आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

दरम्यान, मणिपूर पोलिस आणि भारतीय लष्कराच्या क्रॅक युनिटने संयुक्त कारवाईत इम्फाळपासून 51 किमी दूर असलेल्या चुराचंदपूर या डोंगरी जिल्ह्यातून संशयितांना पकडले. जिथे 3 मे रोजी वांशिक हिंसाचार सुरू झाला होता. या ठिकाणी अनेक कुकी बंडखोर गटांनी ऑपरेशन्सच्या त्रिपक्षीय निलंबनावर (SoO) a स्वाक्षरी केल्याचे वृत्त आहे. हे करार या डोंगरी जिल्ह्यावर आधारीत असल्याचे समजते. आरोपींना पकडण्यात आल्यानंतर सैन्याने त्यांना तातडीने विमानतळाकडे रवाना केले. विमानतळावर सीबीआयचे पथक त्यांची वाट पाहात होते. सीबीआय टीम आणि संशयितांनी संध्याकाली 5.45 च्या दरम्यान, आरोपींसह विमानाने उड्डाण घेतले.

आरोपींना अटक झाल्याचे समजतात, काही समूहाचे लोक आक्रमक झाले. त्यांनी विमानतळाकडे कूच करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिले आहे. आरोपींना घेऊन विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी परिसरात जवळपास एक तासभर मोठा तणाव होता. संभाव्य स्थिती आणि परिसरातील ताण याबाबत विमानतळाचे रक्षण करणार्‍या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) याबद्दल माहिती देण्यात आली होती. मात्र, सीआयएसएफला करावाई करावी लागेल, अशी कोणताही अनूचित घटना घडली नाही.