Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला असाही आरोप आहे. 4 मे ची ही घटना बुधवारी  उघड झाली कारण या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. मन सुन्न करणारी ही घटना देशात घडलेली असतानाच 5 मे रोजीही अशीच एक घटना घडल्याची माहिती समोर येते आहे. इंफाळच्या पूर्व भागात असलेल्या एका पोलीस ठाण्यात जी सामूहिक बलात्काराची FIR नोंदवण्यात आली. ती संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यासाठीही एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला.  (हेही वाचा - West Bengal: बंगालमधील मालदा येथे मणिपूरसारखे कृत्य; चोरीच्या संशयावरून दोन आदिवासी महिलांना विवस्त्र करून मारहाण)

या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. इंफाळ पूर्वचे पोलीस अधीक्षक शिवकांत यांनीही प्रश्नांना उत्तरं दिलेली नाहीत. बलात्कार किंवा महिला अत्याचारांविषयीची झीरो एफआयआर ही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येते. त्यासाठी गुन्हा कुठल्या हद्दीत घडला त्याची सीमा नाही. मणिपूरच्या हिंसाचारा दरम्यान अशीच एक झीरो एफआयआर दाखल करण्यात आली जी संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग होण्यासाठी एक महिना गेला.

16 मे 2023 रोजी करण्यात आलेली एफआयआर ही 13 जून 2023 ला म्हणजेच जवळपास महिनाभराने इंफाळच्या पूर्व जिल्ह्यात पोरोम्पैट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पीडित मुलीच्या चुलत भावाने इंडियन एक्स्प्रेसला हे सांगितलं की पोलीस 5 मे च्या घटनेनंतर दोन आठवड्यांनी आमच्याशी बोलले. त्यावेळी आम्हाला पोलिसांनी दोन मुलींची ओळख पटवण्यासाठी मृतदेहांचे दोन फोटो दाखवले. आम्ही त्यांची ओळख पटवली होती. पीडित मुलीच्या भावाने हे देखील सांगितलं की आम्हाला शवविच्छेदन अहवालाची प्रतही दिली गेली नाही.