धक्कादायक! अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे मांस खावून करत होता गुजराण; आतापर्यंत भक्षण केले 136 शव
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतात अघोरी कृत्ये आणि अशा गोष्टींची साधना करणाऱ्या समाजाला एक मोठी परंपरा आहे. याच गोष्टीसंदर्भात एक सुन्न करणारी घटना समोर येत आहे. स्मशानभूमीत राहणार्‍या एका बाबाने अंत्यसंस्कार झाल्यानंतर तब्बल 136 मृतदेह बाहेर काढून त्यांचे मांस भक्षण केले आहे. दिवाळीच्या रात्री बाबा आणि त्याच्या शिष्यांच्या हत्येनंतर स्मशानभूमीत मृतदेहांची अशाप्रकारे छेडछाड घडली असल्याच्या बातम्या आल्या. पोलिसांनी मारेकरी आणि त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतर बुधवारी बाबा मृतदेहांचे मांस खात असल्याचे उघड झाले. ज्या व्यक्तीने या बाबाला मारले त्याच्या बहिणीच्या मृतदेहाचे मांस बाबा ब त्याच्या शिष्यांनी खाल्ले होते.

बाबाने मृतदेहाचे मांस खाल्ले असल्याची बातमी काळातच इतर 26 लोक पोलिस ठाण्यात पोहचले व या सर्वांनी असा दावा केला की, बाबाने आपल्या कुटूंबातील व्यक्तीच्या मृतदेहाचे मांस खाल्ले. हे ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी याचा तपास केला असता असे आढळले की, मृतदेह पूर्ण जळण्यापुर्वी हा बाबा मृतदेह  विझवून तो देह काढून घेत असे व आपल्या शिष्यांसह त्या मृतदेहाचे मांस खात असे. (हेही वाचा: अंधश्रद्धेचा बळी; शरीरातून आत्मा बाहेर काढणार सांगून तांत्रिकाने फोडले महिलेचे नाक आणि डोळे, त्रिशुळाने भोकसून केला खून)

वीरेंद्र यांच्या मुलीचा मृत्य झाल्यानंतर तिच्या जवळच्या स्मशानामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री या मृतदेहाचा काही भाग गायब असल्याचे लक्षात आहे. त्यानंतर वीरेंद्र यांचा मुलगा अंकुशने स्मशानभूमीत राहणाऱ्या बाबांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आपल्या साधनेसाठी बहिणीच्या शरीराचे मांस खाल्ल्याची कबुली दिली. याच रागातून अंकुश आणि त्याच्या मित्रांनी दिवाळीच्या वेळेस बाबा व त्याच्या शिष्यांची हत्या केली. त्यानंतरच्या पोलिसांच्या तपासामध्ये बाबाने आतापर्यंत तब्बल 136 मृतदेहाचे मांस खाल्ले असल्याचे समोर आले. बाबा जिथे रहात होता त्या ठिकाणाची झडती घेतली असता भांड्यात मृतदेहाचे तुकडेही आढळून आले.