अंधश्रद्धेचा बळी; शरीरातून आत्मा बाहेर काढणार सांगून तांत्रिकाने फोडले महिलेचे नाक आणि डोळे, त्रिशुळाने भोकसून केला खून
Image For Representation (Photo Credits: File Image)

आजवर अंधश्रद्धा (Superstitions), काळी जादू (Black Magic), तंत्रमंत्र यांचे अनेक धक्कादायक किस्से आपण ऐकले असतील, मात्र झारखंड (Jharkhand) मध्ये अलीकडे घडलेला एकी प्रकार हा अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारा आहे. एका कथित तांत्रिक महिलेने आपल्याकडे आलेल्या महिलेला शरीरातून आत्मा बाहेर काढून दाखवण्याचे सांगत चक्क तिच्यावर त्रिशुळाने वार केला. इतकंच नव्हे तर हेच त्रिशूळ तिच्या शरीरात भोकसून महिलेचे डोळे आणि नाक देखील फोडले. साहजिकच शरीरावरील या अत्याचाराने महिलेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण करत या घटनेची माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या तांत्रिक महिलेचे नाव आलम देवी असे असून ती अनेक वर्षांपासून गावात आपला हा थोतांड व्यवसाय करत होती. यावेळेस ही पीडित महिलेला देखील एका अतृप्त आत्म्याने पिछाडले असल्याचे सांगून तिने आपल्याकडे उपचारासाठी बोलावून घेतले होते, यानुसार मृत महिला आपल्या परिवाराच्या समवेत आलम देवी कडे गेली होती. तिथे गेल्यावर आलम देवीने या महिलेवर त्रिशुळाने वार केले आणि हा सर्व प्रकार पुढे घडला. (Black Magic: सरकार वाचावे म्हणून जेडीएस करत आहे जादू टोना? जेष्ठ नेते लिंबू घेऊन फिरताना आढळले; भाजप चा आरोप)

आश्चर्य म्हणजे हा सर्व प्रकार घडत असताना या पीडित महिलेचा परिवार देखील तिथेच उपस्थितीत होता, मात्र या तांत्रिक महिलेने दुसऱ्या महिलेला एका बंद खोलीत नेऊन तिथे हा प्रकार केला. पीडित महिलेच्या किंचाळ्या ऐकल्यावर परिवाराने दरवाजा तोडून त्या खोलीत प्रवेश केला.मात्र कोणाला काही कळायच्या आधीच ही महिला मरून पडली होती.

दरम्यान, आलम देवी आणि तिचा पती सत्येंद्र उरांव यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.