Dog | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका पुरुषाने एका कुत्र्यावर बलात्कार (Man Rapes Dog) केला आहे. महत्वाचे म्हणजे जेव्हा त्याचे हे कृत्य शेजाऱ्याने पहिले, तेव्हा या व्यक्तीने कुत्र्याला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. या घटनेत कुत्रा जखमी झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ग्रेटर नोएडातील बीटा-2 कोतवाली भागातील अल्फा-2 मध्ये राहणाऱ्या एका महिला वकिलाने एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या एफआयआरनुसार, अल्फा-2 मध्ये भाड्याने राहणाऱ्या सोनवीरने एका मादी कुत्र्यावर बलात्कार केला आहे.

आरोपीने रस्त्यावरील मादी कुत्री डेझीला पकडून त्याच्या घरात नेले. तेथे बलात्काराची घटना घडली. घटनेच्या वेळी तेथे राहणाऱ्या काही लोकांनी ते पाहिले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला, त्यानंतर घटनास्थळी बरेच लोक जमा झाले. एफआयआरमध्ये महिला वकिलाने सांगितले की, आवाज ऐकून ती देखील तिथे पोहोचली. यानंतर डायल-112 वर माहिती देण्यात आली. आवाज करून लोक जमा झाले तेव्हा त्या व्यक्तीने कुत्र्याला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. (हेही वाचा: Uttar Pradesh Crime: दारूच्या नशेत पत्नीचा गळा दाबून केला खून, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना)

या घटनेत कुत्र्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बीटा-2 पोलीस ठाण्याचे स्टेशन प्रभारी यांनी सांगितले. आरोपीला ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, याआधीही पश्चिम दिल्लीतील हरी नगर पोलीस स्टेशन परिसरातील लेक पार्कमध्ये अशीच घटना समोर आली होती. एका तरुणाने रस्त्यावरच्या कुत्र्यावर बलात्कार केला होता. या क्रूरतेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.