Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बांदा येथे एकाने दारूच्या नशेत पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने बाथरुममध्ये पत्नीचा गळा आवळून खून केला.या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गिरवण पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मुंगुस गावाचे आहे. बबुल असे या गावातील रहिवासी आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी पती दारूच्या नशेत घरी आला होता. त्यांच्या दोघांमध्ये काही कारणांमुळे भांडण सुरु झाले. पत्नीने दारू पासून दुर राहण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी रागावला आणि त्यांनी तिची मारहाण केली. महिला स्वत:ला वाचवण्यासाठी बाथरुममध्ये लपली. तीचा पाठलाग करत आरोपीने बाथरुममध्ये तिचा गळा दाबला. दरम्यान तीनं श्वास घेण्यास त्रास झाला आणि तीचा मृत्यू झाला.
पोलिसांना या घटनेचीम माहिती मिळताच, घटनास्थळी आले. मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी पतीला चौकशी साठी ताब्यात घेतले. चौकशीतून दारूच्या नशेत पत्नीचा खून केल्याचं पती आरोपीने कबुल केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिस कोठडी सुनावली. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.