केवळ तंबाखू (Tobacco) दिली नाही, इतक्या क्षुल्लक कारणावरुन संतापलेल्या एका दिराने चक्क आपल्या भावयजीवर जीवघेणा हल्ला केला आहे. तर पाच वर्षांच्या पुतण्याची म्हणजेच भावाच्या मुलाची कुऱ्हाडीने खांडोळी केली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील शहडोल जिल्ह्यातील बेओहारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरकछ गावात शनिवारी (3 फेब्रुवारी) रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावली आणि कायदेशीर कारवाई सुरु केली. रामला कोल (30) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्यालाताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
तंबाखू न दिल्याचा राग
मध्य प्रदेश राज्यातील बेओहरी पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहन पडवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामला कोल याने आपल्या मोठ्या भावाची पत्नी सुखीबाई (वय 35) हिच्याकडे तंबाखू मागितली. मात्र, तिने घरात तंबाखूच शिल्लख नसल्याचे सांगितले. तसेच, घरात उपलब्ध नसल्याने आपण सध्या तंबाखू देऊ शकत नसल्याचे तिने सांगितले. ज्यामुळे रामला कोल भलताच संतापला. त्याने आपल्याला तंबाखू दिली नाही याचा राग मनात धरला. हा राग त्याच्या मनात दिवसभर धुमसत होता. त्यातूनच त्याने रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हातात कुऱ्हाड घेऊन घरात प्रवेश केला. त्या वेळी सुखीबाई आणि तिचा पाच वर्षांचा मुलगा झोपला होता. त्याने घरात जबरदस्तीने प्रवेश करताच हातातील कुऱ्हाने दोघांवरही घाव घातले. यात घाव वर्मी लागल्याने पाच वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर सुखीबाई गंभीर जखमी झाली. (हेही वाचा, Dharmaveer killed Sundari: धर्मवीर सुंदरीवर चिडला, तलवारीने गळा चिरला)
कुऱ्हाडीने घाव, पुतण्या ठार, भावयज जखमी
दोघांनाही रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी रामला कोल याने घटनास्थळावरुन पोबारा केला. सुखीबाई हिच्या आरडाओरड्याने शेजारी जमा झाले. त्यांनी रक्ताने माखलेल्या सुखीबाई आणि तिच्या मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, पाच वर्षाच्या तिच्या मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर, सुखीबाई हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अन्वये पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी सुरु आहे. (हेही वाचा, धक्कादायक! जेवणात मटन वाढले नाही म्हणून पतीकडून पत्नीची जाळून हत्या)
तंबाखू
तंबाखू ही एक वनस्पती आहे. ज्यामध्ये निकोटीन असते. जे एक व्यसनाधीन औषध. तंबाखू हा तंबाखूच्या वनस्पतींच्या पानांपासून बनवला जातो. जो निकोटियाना आणि सोलानेसी प्रवर्गाचा भाग आहे. तंबाखूच्या 70 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, परंतु मुख्य व्यावसायिक पीक निकोटियाना टॅबॅकम आहे. तंबाखू सेवन केल्याने कर्करोगाचा धोका संभवतो. अनेक लोक तंबाखू सेवन करतात. या सेवनाचा अतिरेक हा व्यसनाधीनता मानली जाते.