उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील ललितपूर (Lalitpur) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने केवळ पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चक्क आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या केली. इतकेच नव्हे तर त्याने घरावर दरोडा (Robbery At House) पडल्याचा बनावही केला. मात्र, पोलिसांनी (Uttar Pradesh Police) आरोपीची बनावेगिरी उघडी पाडली आणि त्याला अटक केली. नीरज कुशवाह असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी आता त्याच्यावर जुन्या गुन्ह्यासोबतच हत्या (Murder) आणि दरोड्याचा प्रयत्न असा नवा गुन्हाही दाखल केला आहे.
विवाहबाह्य संबंधातून कलह
उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नीरज आणि त्याची पत्नी मनीषा यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. या विवाहातून त्यांना एक वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र, पती पत्नीमध्ये प्रदीर्घ काळापासून कौटुंबीक वाद होते. हा वाद विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन होता. यातून त्यांचे नियमीत खटके उडत असत. ही घटना घडली त्या दिवशीही आरोपीचे आणि त्याच्या पत्नीचा खटका उडाला आणि त्यांचे भांडण झाले. त्यातून त्याने पत्नी आणि मुलीची बॅटने प्रहार करत हत्या केली. (हेही वाचा, Snake Kills Wife And Daughter: विषारी सापाचा वापर करुन पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपीला अटक)
पत्नी आणि मुलीची हत्या आणि दरोड्याचा बनाव
दरम्यान, पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंततर आता पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल हे लक्षात येताच आरोपीने बनाव रचला. त्याने स्वत:च्याच घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने खोटी दरोडेखोरी घडवून आणली. घरातील साहित्य अस्ताव्यक्त केले. इतकेच नव्हे तर त्याने स्वतःला जखमी केले आणि जाणूनबुजून स्वतःच्या राहत्या घराची तोडफोड केली. इतके सगळे केल्यावर त्याने आपल्या एका मित्राशी संपर्क साधला. त्याला सांगितले की, मुखवटा घातलेल्या दरोडेखोरांच्या एका गटाने त्याच्या घरावर दरोडा टाकला. या वेळी झालेल्या झटापटीत त्यांनी माझी पत्नी आणि मुलीचा खून केला आणि मलाही मोठ्या प्रमाणावर जखमी केले. घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि इतर काही साहित्य घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. (हेही वाचा, Loot in Axis Bank Branch Video: बिहार मध्ये अॅक्सिस बॅंक ब्रांच मध्ये चार जणांकडून बंदुकीच्या धाकावर 1 कोटींची लूट)
पोलीस तपासात आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
दरम्यान, सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी येत चौकशी सुरु केली. आरोपी नीरज कुशवाह याचा जबाब नोंदवला गेला. दरम्यान, पोलिसांच्या चौकशी वेळी नीरजने दिलेल्या जबाबांमध्ये तफावत आढळून आली. इतकेच नव्हे तर कथित दरोड्याची पुष्टी करणारे सबळ पुरावेही मिळाले नाहीत. त्यामुले पोलिसांनी संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली. सखोल चौकशीत अखेर नीरजने निर्घृण हत्येची कबुली दिली. विवाहबाह्य संबंधातून त्याचे पत्नीशी सततच्या वादा होत. त्यातूनच त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याची कबुली दिली.