Mamata Banerjee Nandigram Incident: नंदीग्राम येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूकीच्या प्रचारादरम्यान दुखापत झाल्याने राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजप पक्षाने निवडणूक आयोगाकडे अशी मागणी केली आहे की, ममता बॅनर्जी ज्या SSKM रुग्णालयात दाखल झाल्या होत्या तेथील उपचारासंबंधित रिपोर्ट्स सार्वजनिक करण्यात यावेत. त्यामुळे लोकांना घटनेची सत्यता तरी कळू शकेल. तर नंदीग्राम येथील घटनेमुळे निवडणूक आयोगाने टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या सिक्युरिटी डायरेक्टर आणि ईस्ट मिदनापुर चे पोलीस अधिक्षक यांचे निलंबन केले आहे. त्याचसोबत जिल्हा अधिकाऱ्यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने जिल्हा अधिकारी विभु गोयल यांची तत्काळ बदली करत गैर निवडणूक पदावर तैनात करण्याचे निर्देशन दिले होते. गोयल यांच्या जागी 2005 बॅचचे आयएएस अधिकारी स्मिता पांडे यांना जबाबदारी दिली गेली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यास असक्षम ठरलेले ईस्ट मिदनापुरचे पोलीस अधिक्षक एसपी प्रवीण प्रकाश यांना सुद्धा तत्काळ निलंबित केले आहे. प्रवीण यांच्या जागी 2009 बॅचचे आयपीएस सुनील यादव यांना जबाबदारी दिली गेली आहे.(Mamata Banerjee's Video: ममता बॅनर्जी यांचे समर्थकांना शांतता राखण्याचे अवाहन; रुग्णालयातून व्हिडिओ प्रसिद्ध केला)
Tweet:
Election Commission of India (ECI) rules out an attack on CM Mamata Banerjee. Details to follow: ECI decision based on a report by state's Observers and Chief Secretary
— ANI (@ANI) March 14, 2021
निवडणूक आयोगाने पंजाबचे माजी डीजीपी इंटेलिजेंस अनिल कुमार शर्मा यांना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठी एक विशेष पोलीस पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर विवेक दुबे अतिरक्त एके शर्मा दुसरे विशेष पोलीस पर्यवेक्षक असणार आहेत. ऐवढेच नव्हे तर या प्रकरणाचा तपास 15 दिवसात पूर्ण करण्यासह 31 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाला त्याचा रिपोर्ट द्यावा असे निर्देशन दिले आहेत.