Road Accident In Jaunpur फोटो सौजन्य -X/@NNBharatvarsh)

Road Accident In Jaunpur: उत्तर प्रदेशातील जौनपूर (Jaunpur) मध्ये एक मोठा रस्ता अपघात (Accident) झाला आहे. जौनपूर जिल्ह्यातील बादलपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सारोखानपूर गावाजवळ आज पहाटे 5 वाजता एक हा अपघात झाला. या अपघातात 8 यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला तर 40 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच डीएम-एसएसपी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या डबलडेकर बस आणि सुमोचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्या नऊ भाविकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक कुटुंब झारखंडहून जौनपूरमधील एका गावाजवळ सुमो कारने महाकुंभ स्नानासाठी जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली, ज्यामुळे हा अपघात झाला. सुमो कार अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा - Nagpur Accident: नागपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 20 जण जखमी)

दरम्यान, या अपघातानंतर काही तासांनी, भाविकांनी भरलेली डबल डेकर बस रस्त्यावर उभ्या असलेल्या तांदळाने भरलेल्या ट्रकला मागून धडकली. ही बस महाकुंभ स्नानासाठी दिल्लीहून प्रयागराजला जात होती. बस अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातांमध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. बदलापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सारोखानपूर येथे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.