Maharashtra Weather News : राज्यात पुढील 24 तासांसाठी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र भागामध्ये उष्णतेची लाट (Heat wave)येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील एक किंवा दोन जिल्हयांत विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) कुठे उष्णतेची लाट असतानाच शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे. (हेही वाचा :Weather Update: उष्णतेच्या लाटेबाबत अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता )
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह अधिक वाढत असतानाच काही भागांना मात्र अवकाळी पावसाचा मारा सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांचे डोळे आपोआप आकाशाला लागले आहेत. एकंदर राज्यातील हवामानाची स्थिती सातत्यानं बदलत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातले बहुतांश जिल्हे 40°c च्या पलिकडे गेले आहेत. सोलापूरात तापमान 44°c नोंदवले गेले. ठाणे जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअस वर गेले. पुण्यात तापमानाचा परा 41.7 अंश सेल्सिअस, मालेगावात 43 अंश तर, संभाजीनगरचा पारा 40 अंशाच्याही पलिकडे पोहोचले आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि बिहारमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आरोग्यविषयक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी शाळांना सुट्ट्याही जाहीर केल्या आहेत.
मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/Kz4ZCap1mb
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 30, 2024