Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

Weather Update: उष्णतेच्या लाटेबाबत अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

उष्णतेच्या लाटेबाबत अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांसाठी पुढील 3 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

राष्ट्रीय Shreya Varke | Apr 29, 2024 11:08 AM IST
A+
A-
Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Weather Update: उष्णतेच्या लाटेबाबत अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांसाठी पुढील 3 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. या राज्यांतील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेले आहे. दुसरीकडे, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आज तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

 IMD च्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही तापमान 42 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले आहे. मात्र, येथे हिटवेव्हचा इशारा देण्यात आलेला नाही.

उष्णतेच्या लाटेबाबत अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे तापमानात कोणतीही घट होणार नसल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. राजधानी दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला नसला तरी येथे तीव्र उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे.

पाहा पोस्ट:

त्याचवेळी, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.


Show Full Article Share Now