Maharashtra Tableau Representational Image (Photo Credits: Twitter)

गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2021 Parade) राजपथावर झालेल्या परेडमध्ये महाराष्ट्राचे चित्ररथ केंद्राने नाकारला होता. मात्र यंदाच्या राजपथावरील परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्ररथात यंदा महाराष्ट्रातील संतांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. या चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आल्याची मिळत आहे. त्यामुळे यंदा संपूर्ण महाराष्ट्र या चित्ररथाची आतुरतेने वाट पाहत आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्राचा ‘स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग - कान्होजी आंग्रे’ हा चित्ररथ केंद्राकडून नाकारण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रवासियांचा हिरमोड झाला होता. मात्र तो चित्ररथ मुंबईमधील शिवाजी पार्क (Shivaji Park ) येथे झालेल्या पथसंचलनात या चित्ररथाची झलक दाखविण्यात आली. मात्र यंदा महाराष्ट्राचा नवा चित्ररथ राजपथावर दिसणार आहे.हेदेखील वाचा- Republic Day 2020: प्रजासत्ताक दिनावेळी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यांच्या चित्ररथाचा प्रस्ताव नाकारला

ABP माझा ने दिलेल्या माहितीनुसार, चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महारांजाची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मुर्ती समोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी 8 फुट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. या पाठोपाठ राज्यातील संतांचे व कोटयावधी भक्तांचे दैवत असणा-या पांडुरंगाची कटेवर हात असणारी 8.5 फुट उंचीची मूर्ती उभारण्यात आली आहे.

या चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात असून रंगकाम सुरु आहे. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या प्रतिकृती असणार आहेत.

1980 मध्ये साकारण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. तसेच 1983 मध्ये बैलपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथानेही क्रमांक पटकावला होता. त्यानंतर 1993, 1994, 1995 अशा सलग तीन वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात क्रमांक पटकावला होता.