Maharashtra Anti-Terrorism Squad: आर्थर रोड कारागृहात साक्षीदारांना धमकावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई
Prison (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra Anti-Terrorism Squa) मोठी कारवाई करत साक्षीदारांना धमकावणाऱ्या एका रॅकेटचा परदाफाश केला आहे. महाराष्ट्र एटीएस डीआयजी शिवदीप लांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी आर्थर रोड काराग्रह (Arthur Road Central Prison ) येथे जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका गँगस्टर हरीश मांडवीकर (Harish Mandvikar) याच्यासह कारागृह कॉन्सेटबल अर्जुन घोडके याच्यासह आणखी काहींना अटक केले आहे.

एटीएसच्या तपासात पुढे आले की, गॅंगस्टरच्या निरोपाची चिठ्ठी घेऊन काही लोक कारागृहातून बाहेर जातात आणि त्याच्या साथिदाराला देतात. या चिठ्ठीच्या माध्यमातून साक्षीदारांना धमकावले जात असे. या प्रकारात काही पोलीस आरोपींची मदत करत असत.

दरम्यान, या प्रकरणात गँगस्टर हरीश मांडवीकर याला सोमवारी (21 डिसेंबर) अटक करण्यात आली होती. हरीश मांडवीकर आगोदरपासूनच मुंबई येथील आर्थर रोड काराग्राहात एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.त्याच्यावर आरोप आहे की तो आपल्या साथीदारांच्या माध्यमातून साक्षीदारांना धमकावणाऱ्या रॅकेटचे नेतृत्व करत असे. (हेही वाचा, Coronavirus: येरवडा, आर्थर रोड, कल्याण, ठाणे यांसह राज्यातील कारागृह Lockdown)

एटीएसने म्हटले आहे की, जून 2015 मध्ये त्यांनी मेफेड्रिन निर्मिती आणि डिस्टिब्यूशन रॅकेट उद्ध्वस्त केले होते. यात सुमारे 155 किलोग्राम कच्चे आणि तयार केलेले कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रीन जप्त केले होते. या प्रकरणात एटीसीने सात लोकांना अटक केली होती. यात साजिद इलेक्ट्रिकवाला नावाचाही एक आरोपी होता.

साजिद इलेक्ट्रिकवाला हा आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या हरीश मांडवीकर याच्या संपर्कात होता. इलेक्ट्रिकवाला याच्या विरोधात न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला होता. परंतू, लॉकडाऊन असल्याने त्याच्यावरील सुनावणी टळली होती. पुढची तारीख नोव्हेंबर 2020 मध्ये होती. या काळात मांडवीकर आणि त्याच्या लोकांनी एटीएसच्या साक्षीदारांना धमकावले.