मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील रतलाम (Ratlam) जिल्ह्यात एक धक्कादायक अपघात घडला आहे. ट्रकने (Truck Accident) दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात 6 जण जागीच ठार, तर इतर 12 जण जखमी झाले. ट्रकच्या धडकेमुळे लोक चिरडले गेल्याने हा अपघात (Truck Accident) झाला. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रतलाम जिल्ह्यापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या रतलाम लेबाड रोडववर असलेल्या सत्रुंडा गावातील एका चौकात ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, ट्रक रतलामहून बदनावरला जात असताना टायर फुटला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हे वाहन चौकाचौकाजवळील बस स्टॉपवर थांबलेल्या लोकांच्या मोठ्या समूहावर वेगाने जाऊन आदळले.
दरम्यन, छत्तीसगडमध्येही एक ट्रकअपघात झाला. या अपघातात 2 जण ठार तर 30 हून अधिक जण जखमी झाले. कांकेर जिल्ह्यातील पोंडगाव, अंतागड येथे मालवाहू मालवाहू पलटी होऊन हा अपघात घडला. जखमींना स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल आहे. (हेही वाचा, ST Bus Accident Yavatmal: एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात; 4 ठार, 13 गंभीर जखमी; यवतमाळ जिल्ह्यातील घटना)
ट्विट
Chhattisgarh | Two people killed, more than 30 people injured after a goods carrier they were travelling in overturned in Pondgaon, Antagarh of Kanker district; Injured admitted to a local health centre pic.twitter.com/DEYOwUPyS9
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 4, 2022
दरम्यान, महाराष्ट्रामध्येही झालेल्या एसटी बस आणि टियागो कार अपघातात 4 जण जागीच ठार तर 13 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात अमरावती-यवतमाळ मार्गावर असलेल्या नेर जवळील लोणी गावानजिक रविवारी (4 डिसेंबर) दुपारच्या सुमारास झाला. अपघात इतका भयावह होता की, तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु असून, जखमींना नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.