मध्य प्रदेश: शाजापुर येथे 80 वर्षीय वृद्धाला बेडला बांधून ठेवल्याप्रकरणी मोठी कारवाई, नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन रद्द करत रुग्णालय केले सील
वृद्धाला दोरीने बेडला बांधल्याप्रकरणी कारवाई (Photo Credits-ANI Twitter)

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णांसह बळींचा आकड्यात ही भर पडत आहे. याच दरम्यान, शनिवारी मध्य प्रदेशातील शाजापुर मधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र या प्रकरणी विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. शाजापुर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका 80 वर्षीय वृद्धाला बिलाची रक्कम फेडणे अशक्य होते. त्यामुळे वृद्धाला बेडला बांधून ठेवल्याचे समोर आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यामुळे या प्रकरणी आता रुग्णालयाच्या मॅनेजरच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच आयपीसी कलम 342 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐवढेच नाही तर नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द करत रुग्णालय सील करण्यात आले आहे.

एएनआय यांनी दिलेल्या बातमीनुसार, जिल्हा कलेक्टर दिनेश जैन यांनी असे म्हटले की शाजापुर येथे एका वृद्ध व्यक्तिला रुग्णालयाचे बिल भरण्यास जमले नाही. त्यामुळे व्यक्तिला रुग्णालयातील बेडला बांधून ठेवल्याने मॅनेजरच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन सुद्धा निलंबित करत सील केले आहे. त्याचसोबत रुग्णालयातील जे रुग्ण ओपीडी मध्ये होते त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवले आहे.(मध्य प्रदेश: हॉस्पिटलचं बिल भरलं नाही म्हणून 80 वर्षीय वृद्ध रुग्णाला बेडवर दोरीने बांधून ठेवलं; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले चौकशीचे आदेश)

या प्रकरणी  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वत: दखल घेतली आहे. त्याचसोबत त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशन दिले आहेत. पीडित वृद्धाच्या मुलीने आरोप लावत असे म्हटले की, शुक्रवारी रात्री त्यांचे पैसे खर्च झाल्याने वडिलांचा डिस्चार्ज करण्याचे ठरवले. तर जवळजवळ 11 हजार रुपये रुग्णालयात यापूर्वी जमा केल्याचे ही स्पष्ट केले आहे.