मध्य प्रदेश मध्ये ऑपरेशन लोटस यशस्वी? कमलनाथ सरकार ची 16 मार्च रोजी होणार बहुमत चाचणी; राज्यपाल लालजी टंडन यांचे आदेश
कमलनाथ (Photo Credit: Twitter)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh)  मध्ये मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांचे सरकार टिकून राहणार का की भाजपचे (BJP)  ऑपरेशन लोटस (Opreation Lotus)  आपली सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होणार हे आता येत्या 16 मार्च रोजी सिद्ध होणार आहे, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन (Governor Lalji Tandon) यांच्या आदेशानुसार येत्या 16 मार्च रोजी म्हणजेच उद्या कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी (Floor Test)  होणार आहे. काँग्रेसचे पूर्व निष्ठावंत आमदार ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी एकाएकी काँग्रेसचा हात सोडत आपल्या पदाचा आणि काँग्रेस सभासद पदाचा राजीनामा दिला ज्यामुळे सिंधिया यांचा पाठिंबा असणाऱ्या 22 आमदारांनी सुद्धा राजीनामे दिले. यामुळे साहजिकच कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आले आहे. मात्र निदान बहुमताचा आकडा तरी कमलनाथ यांच्या पाठीशी आहे का? याचे उत्तर आता उद्याच्या फ्लोर टेस्ट नानंतरच समजू शकेल.

प्राप्त माहितीनुसार, उद्या 16 मार्च रोजी मध्य प्रदेशचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे, या अधिवेशनाच्या सुरुवातीला ही बहुमत चाचणी होणार आहे, यावेळी काँग्रेसतर्फे सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप ही बजावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले सरकार बहुमत सिद्ध करेल आणि कार्यकाळही पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला होता या पार्श्वभूमीवर सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांंच्या पक्षात असलेल्या 92 कॉंग्रेस आमदारांची जयपुरला रवानगी करण्यात आली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असली तरी अद्याप भाजपात प्रवेश घेतलेला नाही. मागील काही काळात त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्यांनी " मी यापक्षासाठी आणि परिवारासाठी 18 वर्षे निष्ठा दाखवली. मात्र मला वेळोवेळी डावलण्यात आलं" अशी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती, ही नाराजी काँग्रेस पक्षाकडून दूर केली जाणार की आता भाजपची साथ घेत कुठल्या नव्या वाटेवर सिंधिया उतरणार हे सिद्ध पाहणे महत्वाचे ठरणार आहे.