कमलनाथ (Photo Credits: IANS)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस (Opreation Lotus)  यशस्वी ठरले आहे, मुख्यमंत्री कमलनाथ (CM Kamalnath) यांनी आजच्या बहुमत चाचणी विश्वासदर्शी ठरावाच्या आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  काहीच वेळात कमलनाथ राज्यपाल लालजी टंडन (Lalji Tandon) यांना भेटुन आपला राजीनामा देतील. काँग्रेसचे युवा फळातील नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी 9 मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्यासोबतच अन्य 22 आमदारांनी सुद्धा काँग्रेसला  (MP Congress) सोडचिठ्ठी दिली होती, त्यांनतर हे संपूर्ण मध्ये प्रदेश राजकीय नाट्य सुरु झाले, कमलनाथ यांना अवघ्या 15 महिन्यातच राजीनामा द्यायला लावल्याने भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

कमलनाथ यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला मध्य प्रदेश मध्ये काम करण्यासाठी केवळ 15 महिने मिळाले याचा खेद व्यक्त केला मार त्याच वेळी आपण शेती आणि रोजगाराच्या संबधी अनेक महत्वाची कामे कमी वेळात केल्याचे समाधान आहे असेही ते म्हणाले. दुसरीकडे भाजपवर हल्लाबोल करताना हातात 15 वर्षे सत्ता असूनही भाजपने राज्यात काम केले नाही आणि आता ते मला मिळालेल्या जनतेच्या बहुमताचा सुद्धा अपमान करत आहेत, ते लोकशाहीचा  अपमान करत आहेत. मध्य प्रदेशच्या जनतेला हरवून भाजप जिंकण्याचा प्रयत्न करत आहे मात्र असं कधीच होणार नाही याची मी खात्री देतो, कारण आज नंतर उद्या आणि उद्या नंतर परवा नक्कीच येईल तेव्हा भाजपचे खोटेपण सिद्ध होईल अशा तीव्र शब्दात कमलनाथ यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

ANI ट्विट

मध्य प्रदेश मध्ये नेमके झाले काय? जाणुन घ्या

MP Congress ट्विट

दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या सोबत भाजपात प्रवेश घेतल्याने आता मध्य प्रदेश भाजपकडे संख्याबळ आहे,  त्यामुळे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली  भाजप पुन्हा एकदा मध्य प्रदेश मध्ये सत्ता स्थापन करू शकते. असे झाल्यास सिंधिया यांना सुद्धा उत्तम पद मिळेल अशी पूर्ण शक्यता आहे.