मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये मुख्यमंत्री कमलनाथ (CM Kamalnath) यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीत (Floor Test) आपल्याकडील संख्याबळ सिद्ध करायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानुसार आज, 20 मार्च शुक्रवार रोजी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंतच्या विधानसभा एक दिवसीय अधिवेशनात कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. याबाबत काल गुरुवारी न्यायालयाने निर्णय सुनावला. भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी कमलनाथ सरकारची तातडीने बहुमत चाचणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी भाजप (BJP) व काँग्रेस (Congress) कडून आपल्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. MP Political Crisis: बंगळूरु येथे हॉटेल बाहेर आंदोलनासाठी बसलेल्या दिग्विज सिंह यांना पोलिसांकडून अटक.
मध्य प्रदेश मध्ये नेमकं घडलं काय?
काँग्रेसच्या युवा फळीतील आमदार नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एकाएकी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला, पक्षात इतकी वर्षे काम करूनही योग्य ती वागणूक मिळत नसल्याची नाराजी सिंधिया यांनी व्यक्त केली होती, तर सिंधिया यांच्या पाठोपाठ त्यांच्या समर्थक आमदारांनी सुद्धा राजीनामे द्यायला सुरुवात केली, त्याच दिवशी तब्बल २२ आमदारांनी आपले राजीनामे दिले. यावरून कमलनाथ यांच्या साकडे बहुमत आहे कि नाही यावर सवाल उपस्थित झाला.
मध्य प्रदेश मध्ये सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला कमलनाथ यांच्या सरकारने बहुमत सिद्ध करावे असे आदेश राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडून देण्यात आले, मात्र त्याच वेळी देशावर कोरोनाचे संकट असताना 31 मार्च पर्यंत मध्य प्रदेश विधानसभा अधिवेशन पुढे ढकलण्यात आले, साहजिकच यामुळे कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी सुद्धा पुढे गेली.
भाजपचे मध्य प्रदेश मधील नेते शिवराज सिंह चौहान यांनी याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या मधील काळात आमदारांचा घोडेबाजार करण्याचे काँग्रेसचे ध्येय आहे, त्यामुळे लवकरात लवकर फ्लोर टेस्ट घेण्यात यावी असे सांगणारी एक याचिका दाखल केली होती, या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आज बहुमत चाचणी घेण्याचे असिड दिले आहेत.
दरम्यान, भाजपकडे सध्या संख्याबळाचा आकडा आहे त्यामुळे जर का मध्य प्रदेश सरकार आज कोसळले तर शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्य प्रदेश मध्ये नक्कीच सत्ता स्थापन करू शकेल, याप्रकरणी नेमका काय निकाल लागणार हे आज समजेल.