मध्य प्रदेश येथे सुरु होणार 1000 गोशाळा, कमलनाथ सरकारची गाईंच्या संरक्षणासाठी नवी योजना
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Getty Images)

भोपाळ: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सरकार आता उत्तर प्रदेशातील सरकार योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)  यांच्या मार्गाने जात असल्याचे दिसून येत आहे. असे सांगितले जात आहे की, कमलनाथ (Kamal Nath) सरकार राज्यात 1000 गोशाळा (Cow Shelter) लवकरच सुरु करणार आहे. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 लाख गाईंची निगराणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी (Officer In Special Duty) भूपेंद्र गुप्ता यांनी मे महिन्याचपासून या गोशाळाची सुरुवात केली जाणार आहे.

तसेच गुप्ता यांनी गोशाळेच्या पहिल्या टप्प्यातील काम सहा महिन्यात पूर्ण केले जाईल असे लक्ष समोर ठेवले आहे. यासाठी एकूण 450 करोड रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तसेच राज्यातील ही प्रथमच अशी योजना आहे जी गोशाळेसाठी सुरु करण्यात आली आहे. (हेही वाचा-Ganga Expressway: दिल्ली ते प्रयागराज प्रवास होणार सोईस्कर, बांधणार जगातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे)

1000 गोशाळेच्या उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे. तर लवकरच या सर्व गोशाळेचे काम पूर्ण करण्यात येईल. राज्यात 6 लाख गाईंची सुरक्षा करणे आवश्यक असल्याने सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.