![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/09/yogi-adityanath-1-784x441-380x214.png)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यात देशातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर बांधण्यात येणारा एक्सप्रेसवे हा प्रयागराज (Prayagraj) येथे जोडण्यात येणार आहे. मात्र सध्या मेरठ (Meerut) येथून प्रयागराज येथे पोहचण्यासाठी 730 किमी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे.
मेरठ-प्रयागराज एक्सप्रेसवे बांधल्याने दिल्लीहून सरळ प्रयागराज येथे जाण्याचा मार्ग सोईस्कर होणार आहे. या एक्सप्रेसवेचे काम सुरु करण्यात आले असून काही भाग प्रवाशांसाठी मोकळा करुन देण्यात आला आहे.युपीची राजधानी लखनौच्या बाहेर प्रथमच योगी सरकारने प्रयागराज येथे कॅबिनेट बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर एक्सप्रेसवे बनविण्यात येणार असल्याची घोषणा केली. या एक्सप्रेसवेला 'गंगा एक्सप्रेसवे' (Ganga Expressway) असे नाव देण्यात येणार असून जवळजवळ 600 किमी लांब असणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले आहे की, एक्सप्रेसवे सहा पदरी असणार आहे. तर उभारणीसाठी तब्बल 26 हजार करोड रुपये खर्च होणार आहेत. त्याचसोबत पश्चिम उत्तर प्रदेशातील काही महत्वाची ठिकाणे या एक्सप्रेसवेमुळे जोडली जाणार आहेत.
सध्या भारतात सर्वात लांब एक्सप्रेसवे युपीमध्ये आहे. आग्रा ते लखनौ दरम्यान जवळजवळ 302 किमी लांब असा हा एक्सप्रेसवे आहे. तर गाजीपूर ते लखनौ दरम्यान 341 किमी लांब एक्सप्रेसवे बांधण्यात येणार असल्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.