मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन (Madhya Pradesh Governor Lalji Tandon) यांना लखनऊ (Lucknow) येथील मेदांता रुग्णालयात ( Medanta Hospital ) दाखल करण्यात आले आहे. ताप आणि यूरिन ट्रॅक्ट मध्ये संसर्ग अशी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी चिंतेचे कोणतेही कारण नाही. लालजी टंडन (Lalji Tandon)) यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल, असे म्हटले आहे.
लालजी टंडन यांच्या आरोग्याबाबात माहिती देताना लखनऊ येथील मेदांता रुग्णालयाचे निदेशक डॉ. राकेश कपूर यांनी सांगिले की, मध्य प्रदेशच्या राज्यपालांची प्रकृती एकदम चांगली आहे. चिंतेचे कारण नाही. आम्हाला विश्वास आहे की, राज्यपाल महोदयांना उद्यापर्यंत डिस्चार्ज दिला जाईल.
राज्यपाल लालजी टंडन हे 10 दिवसांच्या सुट्टीसाठी 19 जून पासून आपले मूळ निवास्थान असलेल्या ठिकाणी म्हणजेच लखनऊ येथे आले आहेत. लालजी टंडन हे एक प्रसिद्ध राजकीय रणनितीकार, भाजपचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे विद्यमान राज्यपाल आहेत. राज्यपाल पदावरील व्यक्ती पक्षनिरपेक्ष मानली जाते. त्यामुळे सध्या त्यांचा भाजप अथवा इतर कोणत्याच पक्षाशी अधिकृत संबंध जोडला जात नाही. (हेही वाचा, Coronavirus & Patanjali: कोरोना व्हायरस पतंजली औषधाने बरा? चाचणी 100% अनुकूल आल्याचा आचार्य बालकृष्ण यांचा दावा; रामदेव बाबा यांचाही दुजोरा)
मध्यप्रदेश के राज्यपाल आदरणीय श्री लालजी टंडन जी के अस्वस्थ होने एवं लखनऊ के वेदांता अस्पताल में भर्ती होने का समाचार प्राप्त हुआ।
मैं ईश्वर से उनके शीघ्र स्वास्थ लाभ की प्रार्थना करता हूँ, आशा है कि वे जल्द ही पूर्ण रूप से स्वस्थ होकर लौटेंगे।
— Dr Raman Singh (@drramansingh) June 13, 2020
राज्यपाल लालजी टंडन हे 15 व्या लोकसभेत लखनऊ येथून सदस्य राहिले आहेत. उत्तर प्रदेशमधून त्यांनी आपल्या राजकीय जीवनास सुरुवात केली. ते भाजप सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांचे निकट सहकारी म्हणून ओळखले जात असे. लखनऊ मतदारसंघातून त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची धुरा सांभाळली होती.