मध्य प्रदेश: मित्राच्या घरी दारु पार्टीत त्याच्याच बायकोवर बलात्कार, नवऱ्याने विरोध केल्याने हत्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

मध्य प्रदेशातील आमलपुर गावात मित्राच्या घरी दारु पार्टी ठेवण्यात आली होती. त्यावेळी अन्य मित्रांनी सुद्धा पार्टी साठी उपस्थिती लावत एकत्र दारु प्यायले. त्यानंतर मित्रांना दारु एवढी झाली की त्यांनी ज्या मित्राने दारु पार्टी ठेवली होती त्याच्याच बायकोवर बलात्कार केला. मात्र नवऱ्याने हा सर्व प्रकार पाहिला असता त्याने तो थांबवण्याचा प्रयत्न ही केला. पण दारुच्या नशेत बुडालेल्या मित्रांनी मित्राचीच हत्या करत महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर मित्रांनी पळ काढला आहे. तसेच महिलेची वैद्यकिय चाचणी करण्यात आली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुनील कुशवाह आणि मनोज हे दोघे मित्राच्या घरी दारु पार्टीसाठी गेले होते. त्या दरम्यान तिघांनी भरपूर दारु प्यायले. त्याचवेळी दारुच्या नशेत बुडालेल्या मित्राच्या बायकोकडे त्यांची नजर गेली. मित्र भरपुर दारु प्यायला असल्याचा फायदा घेत तिच्यासोबत गैरवर्तवणूक करण्यास सुरुवात केली. तर पीडित महिलेने त्यांचा विरोध केला असता तिला मारहाण सुद्धा केली.(संतापजनक! प्रेम प्रकरणांना विरोध केल्याने मित्रांच्या मदतीने 19 वर्षीय मुलीने केली आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या)

पीडिताने असे सांगितले की, सुनील याने तिला फरफडत नेऊन घराच्या पाठील बाजूस घेऊन जात त्याने बलात्कार केला. त्यानंतर त्याचा दुसरा मित्र सुद्धा तेथे आल्याने त्यानेही तेच दुष्कर्म केले. मात्र दारुच्या नशेत असलेल्या मित्राने आपल्या बायकोवर बलात्कार होत असल्याचे पाहिल्यानंतर त्याचा विरोध करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नवऱ्याला जबरदस्त मारहाण करत गळा आवळून हत्या केली. या सर्व प्रकारानंतर दोन्ही आरोपींनी पळ काढला आहे. याबाबत नातेवाईकांना पीडिताने माहिती दिल्यानंतर आरोपींच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.