संतापजनक! प्रेम प्रकरणांना विरोध केल्याने मित्रांच्या मदतीने 19 वर्षीय मुलीने केली आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या
Representational Image (Photo Credits: Facebook)

हृद्य पिळवटून टाकेल अशी धक्कादायक घटना हैदराबाद (Hyderabad)शहरामध्ये घडली आहे. येथे एका 19 वर्षीय मुलीने आपल्या मित्रांच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रजिता (Rajitha) असे या मृत महिलेचे नाव आहे. टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या मुलांसोबत असलेल्या प्रेम प्रकरणांना आई विरोध करत असल्याने किर्ती रेड्डी (Keerthi Reddy)हिने आपल्या मित्रांच्या मदतीने आपल्या आईचीच हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी किर्ती आणि तिच्या 2 मित्रांना अटक केली आहे.

हैदराबादमधील द्वारका कॉलनीमध्ये राहणा-या किर्ती रेड्डी हिचे अनेक मुलांसोबत प्रेमप्रकरणे सुरु होती. ही गोष्ट तिच्या आईला म्हणजेच रजिताला समजताच तिने तिच्या बेताल वागण्याला विरोध केला आणि हे सर्व थांबवावे अशी समज दिली. मात्र आई आपल्याला विरोध केल्याचे पाहून माथेफिरू किर्ती ने आपल्याच सोसायटीतील 2 मित्रांच्या मदतीने आपल्या आईच्या हत्येचा कट रचला.

हेदेखील वाचा- आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्ती सुरुवातीला गुन्हा कबूल करण्यास टाळाटाळ करत आपल्या वडिलांनी आपल्या आईचा छळ केल्यामुळे ती दोन दिवसांपासून गायब आहे असे सांगितले. मात्र तपासाअंती किर्तीनेच या हत्येचा कट रचल्याचे सांगितले.

याप्रकरणी हयातनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.

काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना घाटकोपर परिसरात घडली. जिथे आपल्या जन्मदात्या बापाने आपल्या 5 महिन्याच्या गर्भवती मुलीची हत्या केली होती. आपण आणलेली स्थळं नाकारून आपल्या मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात जन्मदात्या पित्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले.