मध्य प्रदेश: शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळ विस्तार आज होणार, लॉकडाऊन नियम पाळण्याबाबत उत्सुकता
Shivraj Singh Chouhan | (Photo Credits : IANS)

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप (BJP) प्रवेशामुळे मध्य प्रदेश राज्यात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री (Chief Minister) शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या मंत्रिमंडळाचा आज (21 एप्रिल 2020) विस्तार होत आहे. कोरोना व्हायरस संकाटामुळे अवघा देश लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन (Lockdown) नियम कडक करण्यात आल्याने देशभरातील नागरिकांना गर्दी अथवा समूह करण्यावर बंदी आहे. त्यामुळे हा विस्तार कार्यक्रम कशा स्वरुपात पार पडतो. मंत्र्यांना शपथ देताना गर्दी कशा पद्धतीने टाळली जाणार याबाबत उत्सुकता आहे.

आज दुपारी 12 वाजता शिवराज सिंह सरकारचा मंत्रिंडळ विस्तार पार पडत आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांच्यासह इतर पाच जणांचा समावेश होऊ शकतो. कमल पटेल, मीना सिंह, तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत यांच्यावर मंत्रिपदाची धुरा सोपवली जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाचा सामना करताना शिवराज सिंह चौहान यांनी बेजबाबदारपणा दाखवल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नुकताच केला होता. कमलनाथ यांनी म्हटले होते की, केवळ शहरी परिसरात चाचण्या होत आहेत. राज्याच्या ग्रामिण भागात अद्यापही चाचण्या होत नाहीत. मध्य प्रदेशमध्ये 10 लोकांमगाचे निवडक 20-25 नागरिकांची चाचणी होत आहे. जितक्या कमी चाचण्या तितका कमी कोरोना. जितक्या चाचण्या अधिक तितका कोरोना अधिक. (हेही वाचा, Coronavirus Lockdown दरम्यान अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांंना केंद्र सरकारचा दिलासा; Asymptomatic असल्यास राज्यातच कामाच्या ठिकाणी पोहचवण्यास मदत करणार )

आज घडीला देशभरात मध्य प्रदेश हे एकमेव राज्य आहे. ज्या राज्यात ना आरोग्यमंत्री आहे ना गृहमंत्री. ज्या खात्याला मंत्री नाही त्या खात्याचा कारभार मुख्यमंत्र्याके असतो. अशी घटनात्मक तरतूद आहे. त्यानुसार सध्या हा कारभार मुख्यमंत्री चौहान यांच्याकडे आहे, असा आरोपही माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला होता.