कमलनाथ (Photo Credits: IANS)

आजपासून मध्य प्रदेश (Madhya Pradesh)  विधानसभेत अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल लालजी टंडन (Lalji Tandon) यांचे अभिभाषण होईल. अभिभाषणाच्या नंतर विश्वासदर्शी ठराव मांडला जावा असे आदेश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले होते. मात्र यावर सोमवारीच निर्णय घेऊ असे मत विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी मांडले आहे. यामुळे बहुमत चाचणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश मधील मुख्यमंत्री कमलनाथ (CM Kamalnath) यांच्या सरकारमधील बडे नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी एकाएकी काँग्रेस पक्षाचा हात सोडून आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यापाठोपाठ लगेचच मध्य प्रदेशात सुद्धा राजकीय नाट्य सुरु झाले. सिंधिया यांच्या सोबतच 22 अन्य आमदारांनी सुद्धा राजीनामे दिल्याने आता कमलनाथ यांच्या सरकारकडे बहुमताचा आकडा आहे का यावरच सवाल उपस्थित झाला आहे.आजच्या दिवसाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिक वर

प्राप्त माहितीनुसार,राज्यपाल लालजी टंडन यांच्या आदेशानुसार आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शी ठराव मांडला जाणार होता, मात्र आता यावर विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्यास परवानगी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय सोमवारीच जाहीर करण्यात येईल, अशी भूमिका मांडली आहे. याच पार्श्वभुमीवर आता राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ यांना पत्र लिहुन आमदारांना हात वर करुन बहुमत सिद्ध करा असे सांगितले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, कमलनाथ सरकार संकटात सापडले असतानाच गेले काही दिवस जयपूरमध्ये मुक्कामी असलेले काँग्रेसचे आमदार रविवारी भोपाळमध्ये परतले. बंगळूरु येथे असलेले काँग्रेसचे बंडखोर आमदारही मध्य प्रदेशात परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.