Maan Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला 'मन की बात' च्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  जुलै महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच येत्या 26 जुलैला 'मन की बात' (Maan Ki Baat) च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मन की बातसाठी मोदी यांनी श्रोत्यांकडून त्यांचे सल्ले सुद्धा मागितले आहेत. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला मन की बातच्या माध्यमातून एकादा सल्ला द्यायचा असल्यास तो विविध मार्गाने देऊ शकणार आहे. ट्वीट करत मोदी यांनी असे म्हटले आहे की, मला विश्वास आहे की तुम्हाला याबाबत माहिती असेल. जणेकरुन एकजूट होऊन केलेले प्रयत्न हे प्रेरणादायक आणि सकारत्मक ठरले आहेत. असे पैलु तुम्हाला माहिती असतील ज्यामुळे अनेक जणांचे आयुष्य बदलले आहे. तर येत्या 26 जुलैला असणाऱ्या मन की बात मध्ये त्यांना समोर घेऊन या असे आवाहन मोदी यांनी केले आहे.

पुढे मोदी यांनी असे ही म्हटले आहे की, मन की बातसाठी सल्ला देण्यासाठी काही मार्ग आहेत. तुम्ही तुमचा मेसेज रेकॉर्डकरुन 1800-11-7800 या क्रमांकावर पाठवू शकता. तसेच NaMo अॅपच्या माध्यमातून सुद्धा तुमचे विचार पोहचवू शकता. ऐवढेच नव्हे तर Mygov वर सल्ला देऊ शकता.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून Brazil President Jair Bolsonaro यांना कोविड 19 वर मात करण्यासाठी शुभेच्छ!)

यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जुन महिन्याच्या 28 तारखेला मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी मोदी यांनी चीन संदर्भात विविध विषयांबाबत सांगितले होते. पीएम मोदी यांनी त्यावेळी असे ही म्हटले की, भारताकडे नजरवर करुन पाहणाऱ्यांना जशासतशे उत्तर मिळाले आहे. जर भारत मैत्री टिकवणे जाणतो त्याचप्रमाणे डोळ्यात डोळे घालून उत्तर देणे ही भारताला येते.