उत्तर प्रदेशातील लखनौ मध्ये एका मच्छिमाराने रात्रीच्या वेळी मासे पकडण्यासाठी नाल्यामध्ये जाळे पसरले होते. सकाळ पर्यंत एकही मासा त्यात अडकला गेला नव्हता. पण मच्छिमाराने आपल्या आईचा मृतदेह त्या जाळ्यात अडकल्याचे पाहता त्याला धक्काच बसला. या घटनेची माहिती त्याने पोलिसांना दिली असून तिची हत्या झाल्याच संशय व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी तपास केला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.(Uttar Pradesh: भगत सिंह ची भूमिका साकारणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत; गळ्यात फास अडकल्याने झाला मृत्यू)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, लखनौ मधील मलिहाबाद थाने येथील रुसेना गावात राहणारा मच्छिमार रामविलास आपली आई रामकली, तिची दोन मुल रामनाथ आणि शामूसह तीन मुलांसोबत राहतात. गावाबाहेर एक शेती असून तेथे रामविलास याची आई रामकली भाजांची राखण करत असे. रामविलास हा शेताजवळ असलेल्या एका नाल्यात मासे पकडण्याचे काम करतो.
असे सांगितले जात आहे की, घटनेच्या रात्री रामविलास हा आपल्या आईला शेतीच्या येथे जाऊन जेवण दिल्यानंतर मासे पकडण्यासाठी जाळे लावण्यास गेला. त्यानंतर तो घरी आला. राम विलास जेव्हा सकाळी शेतात पोहचला तेव्हा त्याला त्याची आई दिसलीच नाही. तो खुप वेळ आईची वाट पाहत होता. मात्र आई घरी न आल्याने तो नाल्यात माशांसाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेला. जाळे ओढताना ते खुप जड लागत होते.(Unemployment in India: धक्कादायक! देशात बेरोजगारी, मात्र केंद्र सरकारच्या विविध विभागात तब्बल 8 लाख 72 हजार पदे रिक्त)
जाळे खेचल्यानंतर राम विलास याला धक्काच बसला. जाळ्यात मासे नव्हे तर आईचा मृतदेह अडकला गेला होता. शव बाहेर काढल्यानंतर त्याने पोलिसांना याबद्दल कळवले आणि हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी प्राथमिकरित्या असे म्हटले आहे की, तिचा नाल्यात पडून मृत्यू झाला असावा. पण तरीही या प्रकरणी अधिक तपास केला जात असून पुढील कारवाई सुद्धा होणार आहे.