LPG Price in India | (Photo Credit - Twitter)

तेलंगाना (Telangana) राज्याचे मुख्यमंत्री KCR यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केसीआर (KCR ) यांनी शनिवारी (3 ऑगस्ट) आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात गॅस सिलिंडरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो लावत त्यावर 'मोदीजी Rs. 1150' असे लिहिलेले पोस्टर पाहायला मिळते. तसेच, केसीआर यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांवर निशाणा साधत म्हटले आहे की, पाहा तुम्ही तर म्हणाला होता की, पंतप्रधान मोदी यांचे फोटो राज्याराज्यांमध्ये लागले पाहिजेत. पाहा आम्ही लावले आहेत.

दरम्यान, तेलंगणा आणि केंद्र सरकार यांच्यात पाठिमागील काही दिवसांपासून जोरात संघर्ष सुरु आहे. या संघर्षाची सुरवात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या एका विधानावरुन झाला. एका दौऱ्यात सीतारमण यांनी म्हटले होते की, राज्याभरातील रेशन दुकानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले पाहिजेत. सीतारमण यांच्या या विधानावरुन केसीआर यांनी जोरादर टीका केली होती. तेलंगणाचे आरोग्य मंत्री टी हरिश राव यांनी म्हटले की, निर्मला सीतारमण यांचे हे विधान म्हणजे पंतप्रधान पदाच्या प्रतिमेलाच धक्का लावणारे आहे. (हेही वाचा, PM Modi: जाणून घ्या पंतप्रधान मोदींची लाईफस्टाईल, RTI मधून आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे)

ट्विट

ट्विट

निर्मला सीतारण यांनी शुक्रवारी तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जितेश पाटील यांच्यावरही काहीशी टीका केली होती. सीतारमण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता की, रेशनिंग दुकानावर येणाऱ्या अन्नधान्यामध्ये केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा वाटा किती असतो. या प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना देता आले नाही. भारतीय जनता पार्टीची लोकसभा प्रवा योजनेच्या माध्यमातून जहीराबाद लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमात सहभागी होताना सीतारमण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हेही विचारले होते की, विविध रेशनींग दुकानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा का गायब आहे.