पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या दरवाढीनंतर आता देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्येही (Domestic Gas Cylinder Price Hike) वाढ झाली आहे. आज जाहीर केलेल्या दरानुसार आता 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचे (LPG Gas Cylinder) दर 50 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे आजपासून एका गॅस सिलेंडरसाठी तब्बल हजार रूपये सामान्यांना मोजावे लागणार आहेत. मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात एलपीजी गॅस सिलेंडरची ही सलग दुसरी दरवाढ आहे. नक्की वाचा: LPG Cylinder Price Hike: महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नव्या किंमती .
1 मे दिवशी व्यावसायिक वापराच्या 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 102.50 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे या सिलेंडरची किंमत 2355.50 झाली आहे. एकाच आठवड्यात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. यापूर्वी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती. मुंबईत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 होती. आता हा दर वाढून 999.50 झाला आहे.
ANI Tweet
The price of 14.2 kg Domestic LPG cylinder increased by Rs 50 with effect from today. The domestic cylinder will cost Rs 999.50/cylinder from today.
— ANI (@ANI) May 7, 2022
एलपीजीची किंमत ही क्रूडच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असते. कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होत झाल्याने त्याचा परिणाम गॅस सिलेंडर्सच्या दरातही होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढते इंधनदर, युक्रेन-रशिया युद्ध यामुळे जगात अनेक ठिकाणी महागाई वाढत आहे.
भारतामध्ये मागील 10 महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 165 रुपये 50 पैसे महागले आहेत. जुलै 2021 पासून 5 वेळा गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.