LPG (Photo Credits: All India Radio News, Facebook)

लॉकडाउनच्या दरम्यान LPG गॅस सिलिंडरच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. कारण आजपासून विनाअनुदानित गॅस सिलिंडेरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत गॅस सिलिंडरच्या किंमती 162.50 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. आजपासून दिल्लीत 581.50 रुपयांना गॅस खरेदी करता येणार आहेत. यापूर्वी ग्राहकांना 744 रुपये मोजावे लागत होते. दरम्यान विविध राज्यात टॅक्सच्या नुसार गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एलपीजी गॅस सिंलेंडरच्या किंमतीचे पुनरावलोकन करतात.

मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 579 रुपये असणार आहे. यापूर्वी ग्राहकांना 714.50 रुपये मोजावे लागत होते. कोलकाता येथे 190 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता 584.30 रुपयांना खरेदी करता येणार आहे. चेन्नईत 716.00 तुलनेत 569.50 रुपये द्यावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट होण्यामागील कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीच्या रेकॉर्ड कमी झाल्याचे मानले जात आहे.सातत्याने तिसऱ्या वेळेस विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. यामुळे देशातील तब्बल 1.5 कोटी नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला लॉकडाउनच्या 38 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल झालेला नाही.(आरोग्य सेतू अॅप मध्ये Health Status तपासल्यानंतरच ऑफिसला या- सरकराचे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश)

 स्वयंपाक गॅस केवळ देशाच्या बाजारभावावर उपलब्ध आहे.  परंतु प्रत्येक घराला वर्षाला अनुदानित दराने प्रत्येकी 12 सिलिंडर असे 14.2 किलोचे मिळू शकतात. गॅस सिलिंडरच्या अनुदानाची ही रक्कम ग्राहकाच्या थेट बँक खात्यात दिली जाते.  लॉकडाउन लागू झाल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (PMGKY) एप्रिल ते जून या कालावधीत 8 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना 3 एलपीजी सिलिंडर्स मोफत देण्यासाठी नवीन पंतप्रधान गरीब कल्याण योजना (PMUY) सुरू केली आहे.