Aarogya Setu App (Photo Credits: Government of India)

भारतातील कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅप मध्ये हेल्थ स्टेटस (Health Status) चेक करुनच ऑफिसमध्ये हजर होण्याचे आदेश केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी ताबडतोब आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावा, असे आदेशही सरकारकडून देण्यात आले आहेत. तसंच अॅपद्वारे आपले हेल्थ स्टेटस चेक करावे त्यात सेफ (Safe) किंवा लो रिस्क (Low Risk) असे स्टेटस दिसले तरच ऑफिसला यावे, असेही सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे अॅपवरील हेल्थ स्टेटस मॉडरेट (Moderate) किंवा हाय रिस्क (High Risk) दिसत असल्यास ऑफिसला न येता 14 दिवसांसाठी किंवा हेल्थ स्टेटस सेफ किंवा लो रिस्क होत नाही तोपर्यंत क्वारंटाईनमध्ये राहावे, असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.

सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना आणि विभागांना हा अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. आरोग्य सेतू अॅप सरकारद्वारे 2 एप्रिल रोजी लॉन्च करण्यात आला. कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यास तुम्हााल या अॅपद्वारे सतर्क करण्यात येते. हे अॅप लॉन्च झाल्यानंतर 50 मिलियन युजर्स याचा वापर करत आहेत. युजर्स वाढीचे हे प्रमाण इतर अॅपच्या तुलनेत जगात सर्वात वेगवान आहे.

ANI Tweet:

आरोग्य सेतू अॅपचे सध्याचे व्हर्जन हे स्मार्टफोनसाठी अतिशय सुसंगत आहे. विशेष म्हणजे हे अॅप 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 7.5 मिलियन लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय आणि IT यांनी दिली आहे.