तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर (Commercial LPG Cylinder) दरात कपात केली आहे. त्यामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती (LPG Cylinder Price Update) उल्लेखनियरित्या उतरल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति युनिट 115.50 रुपयांनी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या किमती उतरल्याने ही दरकपात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जूनपासून (2022) व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत झालेली ही सातवी घट आहे. एकूण, 19 किलोच्या सिलिंडरचे दर रुपये 610 ने कमी झाले आहेत. कमी झालेल्या सुधारीत दरांसह 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत दिल्लीत ₹1,859 ऐवजी 1,744 असेल. राजधानी दिल्लीसह मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरात ही दरकपात कायम आहे. जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांतील एलपीजी सिलिंडर दर.
एलपीजी सिलिंडर शहरनिहाय सुधारीत दर
मुंबई
जुना दर-1,811.50 रुपये (19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी)
सुधारीत दर- 1,696 रुपये (19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी)
दिल्ली
जुना दर-1,859 रुपये (19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी)
सुधारीत दर- 1,744 रुपये (19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी)
कोलकाता
जुना दर- 1959.00 रुपये (19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी)
सुधारीत दर- 1,846 रुपये (19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी)
चेन्नई
जुना दर- 2,009.50 रुपये (19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी)
सुधारीत दर- 1,893 रुपये (19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी)
इंधन दरावरील किमती कमी करण्याचा निर्णय पाठिमागील काही महिन्यांपासून सातत्याने घेतला जात आहे. या आधी एक ऑक्टोबर रोजी एलपीजी सिलिंडर किमती अशाच प्रकारे कमी करण्यात आल्या होत्या. व्यावसायिक सिलिंडरच्या तुलनेत घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरच्या किमती फारच कमी होत्या. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवरही इंधन दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होत असताना देशांतर्गत किमतीत वाढ कायम ठेवणे योग्य नसल्याची मागणी तेल कंपन्यांकडे सातत्याने होत होती. परिणामी तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Gas Cylinder Weight Complaint: घरी येणार्या गॅस सिलेंडरच्या वजनामध्ये छेडछाड झाल्यास तक्रार कुठे कराल?)
ट्विट
#LPG Price Cut | Price of commercial cylinder (19-kg) cut by ₹115 to ₹1,744 in #Delhi pic.twitter.com/XebsnCRkL1
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) November 1, 2022
कोणत्याही प्रकाचे इंधन दर हे स्थानिक व्हॅटवर अवलंबून असतात. त्यामुळे ते राज्यानुसार भिन्न असतात. व्यावसायिक एलपीजीचे दर मोठ्या प्रमाणात खर्चाशी जुळलेले आहेत. तसेच ते आंतरराष्ट्रीय दरांमध्ये वाढ आणि घसरणीच्या अनुषंगाने पुढे गेले आहेत. त्यामुळे त्यात कपात करणे इष्टच होते, असे अभ्यासक सांगतात.