फारूक अब्दुल्ला (Photo Credits-Twitter)

जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये एका सभेला संबोधित करताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले की, भगवान राम हे केवळ हिंदूंचेच देव नाहीत. धर्माचा विचार न करता त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाचे ते श्रध्दास्थान आहे, असे अब्दुल्ला म्हणाले. फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर निशाणा साधला आणि म्हटले की, पक्ष सत्तेत राहण्यासाठी केवळ रामाचे नाव वापरतो, पण राम हे फक्त हिंदूंचे देव नाही तर सर्वांचा देव आहे. असे त्यांनी यावेळी म्हटले.  (Congress Social Media Profile Photo: 'डरो मत'... राहुल गांधींच्या वादानंतर काँग्रेसने ट्विटरचा प्रोफाइल फोटो बदलला)

"भगवान राम हे केवळ हिंदूंचेच देव नाहीत. तुमच्या मनातून ही धारणा काढून टाका. भगवान राम हे सर्वांचे दैवत आहेत - मग ते मुस्लिम असोत की ख्रिश्चन असोत किंवा अमेरिकन असोत किंवा रशियन असोत, सर्वांची त्यांच्यावर श्रद्धा आहे," असे त्यांनी आयोजित रॅलीत सांगितले. "मला वाटते जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर होतील तेव्हा ते सामान्यांचे लक्ष वळवण्यासाठी राम मंदिराचे उद्घाटन करतील," ते म्हणाले. त्यामुळे मी तुम्हाला लोकांमध्ये जाण्याचे आवाहन करतो आणि त्यांचा द्वेषाचा प्रचार थांबवण्यास सांगा, असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले.

बिगर-भाजप पक्षांमधील ऐक्याबद्दल ते म्हणाले, की "आमच्या ऐक्यात कोणताही अडथळा येणार नाही. मग ते काँग्रेस असोकिंवा पँथर्स. आम्ही लोकांसाठी लढू आणि मरु. पण आम्ही सर्व एकजूट राहू." त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत प्रश्न उपस्थित केले आणि लोकांना त्यांच्या वापराबाबत सावध राहण्यास सांगितले. केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीपूर्वी धार्मिक ध्रुवीकरणाविरुद्ध त्यांनी लोकांना चेतावणी दिली. "निवडणुकीत ते 'हिंदू धोक्यात आहेत' याचा खूप वापर करतील... पण माझी तुम्हाला विनंती आहे की त्याला बळी पडू नका." असे फारुख अब्दुला म्हणाले