Rahul Gandhi (Photo Credit - Congress Twitter)

Congress Social Media Profile Photo: मोदी आडनावावरच्या (Modi Surname) टिप्पणी केल्याबद्दल सुरत कोर्टोने (Surat Court) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवून दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. राहुल गांधी या शिक्षेच्या उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress) रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली. काही नेत्यांनी या निर्णयावर नाराजगी व्यक्त केली. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो बदलण्यास सुरुवात केली. काँग्रेसने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट यांसारख्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन प्रोफाईल फोटो अपलोड केला आहे.

राहुल गांधी यांच्या विरोधात कोर्टाचा निकाल लागताच काँग्रेस नेत्यांनीही त्यांचे प्रोफाईल फोटो बदलण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम हँडलचा डीपीही बदलला आहे. राहुल गांधी यांचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो लावण्यात आला आहे. त्यावर लिहिले आहे की डरो मत. भारत जोडो यात्रे दरम्यानचा हा राहुल गांधी यांचा फोटो आहे.

दरम्यान राहुल गांधी सुरतहून दिल्लीला पोहचल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक जमा झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधीच्या समर्थनात घोषणाबाजी केल्या. सोनिया गांधी यांनी देखील राहुल गांधी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. राहुल गांधी यांच्या शिक्षेच्या निर्णयावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवक टिका केली आहे. सरकार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.