दिल्ली (Delhi) येथीस निर्भया (Nirbhaya) प्रकरणाने देशभरात दुख व्यक्त केले जात होते. तसेच 7 वर्षे उलटून गेल्यानंतर ही अद्याप या प्रकरणी निर्भयाच्या घरातील मंडळींना न्याय मिळाला नसल्याचे तिच्या आईने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
इंडिया टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथे 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर निर्भयाच्या बलात्काराप्रकरणी आरोपींना शिक्षा कधी होणार असा सवाल तिचे वडील बद्रिनाथसिंह आणि आई आशा देवी यांनी केला आहे. तर सत्तेत असणारा प्रत्येक पक्ष आम्हाला न्याय मिळवून देणार अशी आशा दाखवतो. मात्र ही आशा काही काळानंतर फोलच ठरते. फक्त मतांसाठी आमच्या भावनेसोबत खेळखेळला जात असल्याचे निर्भयाच्या आईने म्हटले आहे.(70 वर्षांपासून गावात रस्ता नाही, एसटीची सोय नाही; चिडलेल्या गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार)
देशात अद्यापही एखादी स्री सुरक्षित नाही. दिवसेंदिवस गुन्हाचे प्रकार वाढत चालले असून त्यावर ठोस भुमिका घेतली जात नाही. तसेच लोकांना आता सरकारच्या सिस्टिमवर विश्वास न राहिल्याने यंदा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे दिवंगत निर्भयाच्या आई-वडिलांनी स्पष्ट केले आहे. तर देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. मात्र 12 मे रोजी दिल्ली येथे सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.