प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे ऐवजी सहा दिवस उशिराने लागेल असा दावा निवडणुक आयोगाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. तसेच 21 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत एका मतदार संघामधील कमीतकमी 50 टक्के व्हीव्हीपॅट (VVPT) स्लिप जुळवण्याची मागणी केली होती. त्यामुळे जर विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या मागणीला मान्यता मिळाल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लावण्यासाठी अजून सहा दिवस लागतील असे निवडणुक आयोगाकडून माहिती देण्यात आली आहे.

एका मतदार संघामधील 50 टक्के व्हीव्हीपॅट तपासून पाहिल्यास निवडणुकीच्या प्रक्रियेवर संशय राहणार नाही असे विरोधी पक्षाने म्हटले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आयोगाला विचार करण्यासाठी वेळ देऊ केला होता. तर आयोगाने न्यायालयाला याचे उत्तर देत असे म्हटले आहे की, प्रत्येक संसदीय किंवा विधानसभा मतदारसंघातील 50 टक्के व्हीव्हीटॅप स्लिप्स जुळवल्या गेल्यास मतमोजणीला वेळ लागणार आहे. त्यामुळे अधिक सहा दिवस तरी मतमोजणीसाठी लागणार असल्याची शक्यता आयोगाने न्यायालयात वर्तवली आहे. सध्या स्लिप्स जुळवून पाहण्यासाठी स्वयंचलिच यंत्रणेचा अभाव असून व्हीव्हीपॅट मधून निघणाऱ्या स्पिप्सवर कोणत्याही प्रकारचा बारकोड नाही.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: घराणेशाहीत भाजप एक पाऊल पुढे, काँग्रेसला टाकले मागे; लोकसभा निवडणुकीत चित्र स्पष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस तर अव्वल क्रमांकावर)

परंतु निकाल 30 किंवा 31 मे आधी येऊ शकणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच या स्लिप्स मोजण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची गरज भासणार असून मतमोजणीसाठी सुद्धा मोठ्या जागेची गरज आहे. तर विरोधी पक्षाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांची न्यायालयात याचिका दाखल केली होती.