Lok Sabha Elections 2019: काँग्रेस (Congress) पक्षावर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षच घराणेशाहीत आघाडीवर असल्याचे पुढे आले आहे. घराणेशाहीवरुन बोलताना भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु, लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपने दिलेल्या उमेदवार यादीवर नजर टाकता घराणेशाही भाजपमध्येही बोकाळल्याचे पाहायला मिळते.
इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार घराणेशाहीला प्राधान्य देणाऱ्या प्रमाण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी 59 टक्के उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले आहेत. (हेही वाचा, मावळ लोकसभा मतदारसंघ: पार्थ पवार यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयासाठी ही आहेत आव्हानं)
भाजप लोकसभा उमेदवार घराणेशाहीतून येणारे उमेदवार आणि मतदारसंघ |
|||
क्र | लोकसभा मतदारसंघ | उमेदवार | घराणे |
1. | नंदुरबार | हिना गावित | या महाराष्ट्राचे माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या |
2. | धुळे | सुभाष भामरे | माजी आमदार गोजराताई भामरे यांचे चिरंजीव |
3. | रावेर | रक्षा खडसे | माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कन्या |
4. | दिंडोरी | भारती पवार | माजी आमदार ए. टी. पवार यांच्या कन्या |
5. | मुंबई उत्तर मध्य | पूनम महाजन | भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या
|
6. | बारामती | कांचन कुल | रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी |
7. | अहमदनगर | सुजय विखे पाटील | विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा
|
8. | बीड | प्रीतम मुंडे | भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या |
9. | माढा | रणजीतसिंह निंबाळकर (संभाव्य, अद्याप घोषणा नाही) | माजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांचा मुलगा |
राष्ट्रवादी काँग्रेसमधील 22 पैकी 59 टक्के उमेदवार घराणेशाहीतून
बारामती- सुप्रिया सुळे- शरद पवार यांच्या कन्या
सातारा- उदयनराजे भोसले - छत्रपती शिवाजी महाराज घराण्याचे वंशज, माजी आमदार अभयसिंहराजे भोसले यांचे पुतणे
कोल्हापूर - धनंजय महाडीक - आमदार महादेवराव महाडीक यांचे पुतणे
मुंबई उत्तर - संजय दिना पाटील - आमदार दिना भिमा पाटील यांचे चिरंजीव
ठाणे - आनंद परांजपे - माजी आमदार अशोक परांजपे यांचे चिरंजीव
अहमदनगर - संग्राम जगताप - माजी आमदार अरुण जगताप यांचे चिरंजीव
नाशिक - समीर भुजबळ - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे
मावळ - पार्थ पवार - राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव
दिंडोरी - धनराज महाले - माजी आमदार हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव
उस्मानाबाद - राणा जगजितसींग पाटील - माजी खासदार पद्मसिंग पाटील यांचे चिरंजीव
माढा - संजय शिंदे - आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू
अमरावती - नवनीत कौर राणा - आमदार रवी राणा यांच्या पत्नी
काँग्रेस लोकसभा उमेदवार घराणेशाहीतून येणारे उमेदवार आणि मतदारसंघ |
|||
पक्ष - काँग्रेस | उमेदवार | मतदारसंघ | घराणे |
1 | कुणाल रोहिदास पाटील | धुळे | माजी आमदार रोहिदास पाटील यांचे चिरंजीव |
2 | चारूलता टोकस | वर्धा | दिवंगत खासदार प्रभा राव यांच्या कन्या |
3 | अशोक चव्हाण | नांदेड | दिवंगत केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र |
4 | प्रिया दत्त | मुंबई उत्तर मध्य | माजी खासदार सुनील दत्त यांची मुलगी |
5 | मिलिंद देवरा | मुंबई दक्षिण | माजी खासदार मुरली देवरा यांचे चिरंजीव |
6 | विलास औताडे | जालना | माजी आमदार केशवराव औताडे यांचा मुलगा
|
शिवसेना पक्षातील 23 उमेदवारांपैकी 30 टक्के उमेदवार घराणेशाहीतून
कल्याण - श्रीकांत शिंदे - मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव
कोल्हापूर - संजय मंडलीक - माजी खासदार सदाशिव मंडलीक यांचे चिरंजीव
नाशिक - हेमंत गोडसे - खासदार राजाभाऊ गोडसे यांचे पुतणे
यवतमाळ - भावना गवळी - माजी खासदार पुंडलीकराव गवळी यांच्या कन्या
उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर - राजकीय नेते पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव
सातारा - नरेंद्र पाटील - माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव
वरील यादीवर नजर टाकता भाजपने कितीही सांगितले तरी, भाजपलाही घराणेशाहीची बाधा झाली आहे हे स्पष्ट होते. एकूणच चित्र पाहता अपवाद वगळता सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही असल्याचेच दिसते.