Lok Sabha Election 2024: राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून काँग्रेसचा तगडा उमेदवार मैदानात
Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

उत्तर प्रदेशासह संपूर्ण भारतात लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशासह संपूर्ण भारतात लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, अद्यापही काँग्रेसकडून काही जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यात अमेठी आणि रायबरेली या दोन महत्वाच्या मतदारसंघाचा देखील समावेश आहे. काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांची यादी आज जाहीर केली.  त्यात राहुल गांधी आणि किशोरी लाल शर्मा यांचा समावेश आहे. ( Palghar Lok Sabha Election 2024: पालघर मध्ये शिंदे गटाला धक्का; भाजपा च्या Hemant Vishnu Savara यांना उमेदवारी जाहीर)

पाहा पोस्ट -

अमेठी आणि रायबरेली याठिकाणी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 3 मे आहे. त्यामुळे काँग्रेस या दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यास वेळ केला हे स्पष्ट आहे. मात्र, आज दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आजच उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल.

राहुल गांधी आणि केएल शर्मा शक्तीप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जातात. पण २०१९ च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी या जागेवर राहुल गांधींचा पराभव केला होता. आता भाजपने पुन्हा एकदा अमेठी लोकसभा मतदार संघातून स्मृती इराणी यांना मैदानात उतरवलं आहे.