Lok Sabha (Photo Credits: Twitter Video Grab)

Parliament Winter Session 2023: संसद सुरक्षा भंग प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन द्यावे, या मागणीसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या तब्बल 30 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे या अधिवेशनात आगोदरच 14 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे संसदेतील लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील निलंबीत आमदारांची संख्या आता 43 झाली आहे. संसद सुरक्षेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण चांगलाच गाजतो आहे. विशेष म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचाही निलंबीत खासदारांमध्ये समावेश आहे. जाणून घ्या निलंबीत खासदारांची यादी. (List of suspended MPs From Lok Sabha)

संसदेतील खासदारांची यादी खालील प्रमाणे-

कल्याण बॅनर्जी, ए. राजा, दयानिधी मारन, अपरूपा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, ई.टी. मोहम्मद बशीर, जी. सेल्वम, सी.एन. अन्नादुराई, अधीर रंजन चौधरी, डॉ. टी. सुमाथी, के. नवस्कानी, कलानिधी वीरस्वामी. एन.के. प्रेमचंद्रन, सौगता रॉय, सताब्दी रॉय, असित कुमार मल, कौशलेंद्र कुमार, अँटो अँटोनी, एस.एस. पलानीमणिकम, थिरुनावुक्करासर, प्रतिमा मंडल, काकोली घोष दस्तीदार, के. मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस. रामलिंगम, के. सुरेश, अमरोहन, के. उन्नीथन, गौरव गोगोई आणि टीआर बालू. (हेही वाचा, MPs Suspension From LS: लोकसभेतून Adhir Ranjan Chowdhury सह 31 खासदार आज लोकसभेतून निलंबित)

सरकार मुद्द्यांवर बोलत नाही, उलट निलंबन करते आहे- चौधरी

दरम्यान, निलंबनाबद्दल बोलताना खासदार अधीर रंजन चौधरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "माझ्यासह सर्व नेत्यांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी निलंबित करण्यात आलेल्या आमच्या खासदारांना पुन्हा सभागृहात समाविष्ठ करुन घ्यावे. त्यांचे निलंबन मागे घ्यावे आणि गृहमंत्री सभागृहात यावेत. त्यांनी संसदेच्या सुरक्षा प्रश्न सभागृात निवेदन द्यावी, अशी आम्ही अनेक दिवसांपासून मागणी करत आहोत. पण मुद्द्यांवर बोलण्याऐवजी या सरकारने निलंबनाचा सपाटाच लावल्याचे चौधरी म्हणाले.

एएनआय एक्स पोस्ट

पंतप्रधान, गृहमंत्री संसदेत का बोलत नाहीत?

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स हँडलवरुन या निलंबनाच्या कारवाईचा जोरदार निषेध केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, हिवाळी अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा संसदेच्या बाहेर या विषयावर बोलले होते. मात्र त्याच मुद्द्यावर सभागृहात बोलण्याची त्यांची तयारी नाही. संपूर्ण भारत संसदेतील सुरक्षेच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा करावी असे म्हणतो आहे. असे असतानाही हे सरकार आणि सरकारमधील प्रमुख लोक त्यावर एक शब्द बोलत नाहीत. हे सरकार आपली जबाबदारी आणि कर्तव्यापासून दूर जात असल्याचेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.