छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायगडमध्ये 22 वर्षीय सोशल मीडिया स्टार लीना नागवंशी (Leena Nagwanshi) हिने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लीनाने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे वृत्त आहे. ही घटना रायगडच्या केलो बिहार कॉलनीमधील आहे. घटनेची माहिती मिळताच चक्रधर नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. परंतु पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच कुटुंबीयांनी लीलाचा मृतदेह खाली उतरवला होता.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजेल. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी लीना नागवंशी सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. लीना ही सोशल मीडिया स्टार होती आणि आपले व्हिडीओ व फोटोंच्यामुळे ती अनेकदा चर्चेत असायची. इंस्टाग्रामवर तिचे 10,000 फॉलोअर्स होते.
घटनास्थळी पोहोचलेले चक्रधर नगरचे उपनिरीक्षक दिनेश बोहिदार यांनी सांगितले की, आज दुपारी एक वाजता केलो विहार कॉलनीत राहणाऱ्या 22 वर्षीय लीनाने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तिने दुपट्ट्याने गळफास घेऊन गळफास घेतल्याचे दिसून आले. मात्र ती जिवंत असल्याचे समजून कुटुंबीयांनी आधीच तिला खाली उतरवले होते. मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
(हेही वाचा: UP Shocker: आईने मोबाईल गेम खेळण्यास केली मनाई; रागाच्या भरात 10 वर्षांच्या मुलाची आत्महत्या)
घटनास्थळावरून मुलीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलीस आता या मोबाईलबाबत तपास करत आहेत. वैयक्तिक कारणामुळे लीनाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्यापपर्यंत तिच्या आत्महत्येचे कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.