
L&T Women Get Menstrual Leave: देशातील एल अँड टी कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. देशात पहिल्यांदाच एका खासगी कंपनीनं महिलांना मासिक पाळीदरम्यान महिन्यातून एक दिवस सुट्टी (Menstrual Leave) देण्याची घोषणा केली आहे. एल अँड टीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन (L&T Chairman ) यांनी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक दिवस मासिक पाळीच्या पार्श्वभूमीवर रजा देण्याची नवीन सुविधा सुरू केली आहे. मुंबईमधील पवई कार्यालयात महिला दिनाच्या (Womens Day 2025) कार्यक्रमात कंपनीनं ही घोषणा केली.
अलीकडेच काही दिवसांपूर्वी एस. एन. सुब्रमण्यन यांनी आठवड्यातून 90 तास काम करण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्यांच्या आताच्या निर्णयावरून महिला वर्गाकडून स्वागत केले जात आहे. एल अँड टी कंपनीमध्ये 60,000 कर्मचारी आहेत. त्यापैकी 5,000 महिला कर्मचारी आहेत. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही संख्या 9% इतकी आहेत.Mumbai-Sainagar Shirdi Vande Bharat Train: मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनचे महिलांकडून संचलन; आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम
काय म्हणालेले सुब्रह्मण्यन?
“तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला लागा.” त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊन काम करावं असा सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता.
एयू स्मॉल फायनान्स बँक, ओरिएंट इलेक्ट्रिक, स्विगी आणि झोमॅटो सारख्या अनेक संस्था आणि ओडिशा, बिहार आणि केरळ सारख्या राज्यांनी महिलांसाठी स्वतंत्रपणे असं धोरण स्वीकारलं आहे. तथापि, या धोरणात एल अँड टीच्या नॉन-कन्स्ट्रक्शन आणि नॉन-इंजिनीअरिंग व्यवसायांसारख्या वित्तीय आणि तंत्रज्ञान सेवांशी संबंधित कंपन्यांचा समावेश नाही. कारण या व्यवसायांमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा आहे. तर मुख्य एल अँड टी ऑपरेशन्समध्ये वर्क फ्रॉम ऑफिस अशी पॉलिसी आहे.