Gay Couple | (Photo Credits: ANI)

भारतात समलिंगी संबंधांस कायदेशीर मान्यता मिळाली असून, असे संबंध ठेवणे म्हणजे गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने केव्हाच दिला आहे. त्यामुळे समलिंगी संबंध (Homosexual Relationships) ठेवणाऱ्या व्यक्तिंना समाजाने स्वीकारणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र अनेकदा तसे होताना दिसत नाही. अशीच एक घटना पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातून पुढे आली आहे. या राज्यातील एका समलिंगी जोडप्याने (Gay Couple) थेट पोलीस संरक्षण (Police Protection) मागितले आहे. आपल्या कुटुंबीयांकडूनच आपल्याला जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा या जोडप्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.

पश्चिम बंगाल राज्यातील बारासात (Barasat) येथे राहणाऱ्या या समलिंगी जोडप्याने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करताना म्हटले आहे की, आपल्या जीवितास आपल्याच कुटुंबीयांकडून धोका आहे. जोडप्यातील एका सदस्याने म्हटले आहे की, माझ्या वडीलांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझे कुटुंबीय माझा अशा प्रकारे स्वीकार करण्यात तयार नाहीत. त्यामुळे मला प्रचंड असुरक्षीत वाटत आहे. तसेच, माझा जोडीदारही सुरक्षीत नसून, त्याच्याही जीवीतास धोका आहे. (हेही वाचा, Lesbian Marriage: राजस्थानमधील जैसलमेर येथे पार पडला दोन तरुणींचा समलैंगिक विवाह सोहळा)

एएनआय ट्विट

दरम्यान, भारतात समलिंगी संबंध ठेवणारे लोक आता गुन्ह्याच्या कक्षेत येत नाहीत. समलैंगिक समुदायांसठी भारतात आता वेगळा कायदा तयार करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता देत कलम 377 मधून बाहेर काढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, अशा प्रकारचे आकर्षण हे नैसर्गीत आहे. आपण त्याला नाकारु शकत नाही.